'लालबागचा राजा'चा 26.5 कोटींचा विमा; स्थानिक राहिवासी ते वॉचमन आणि भक्तांना 5 लाख मिळणार

लालबागच्या राजाला 26.5 कोटींचं विमा कवच मिळाले आहे. याचा फायदा स्थानिकांसह येथे दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना देखील होणार आहे. 

Sep 11, 2023, 20:36 PM IST

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती मंडळ आहे. येथे सेलिब्रिटींसह राजकारणी देखील दर्शनाला येतात. लाखो भाविक तासनंतास रांगेत उभ राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. लालबागच्या राजाच्या दर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेवून लालबागचा राजा गणेश मंडळाने 26.5 कोटींचा विमा काढला आहे. 

1/7

लालाबागचा राजा नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती दिंवसेंदिवस वाढत चालली आहे. लाखो भाविक लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येतात. 

2/7

गणपतीचे भक्त, मंडळाचे विश्वस्त, नोंदणीकृत कार्यकारी सदस्य, स्वंयसेवक, स्थानिक रहिवासी, संरक्षण कर्मचारी, वॉचमन यांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्यात आला आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यास 5 लाखांची भरपाई मिळणार आहे.   

3/7

लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंसाठी 7 कोटी 4 हजार रुपयांचं विमा संरक्षण काढण्यात आलेय.  

4/7

विजेच्या उपकरणांमुळे किंवा इतर गोष्टींमुळं नुकसान झाल्यास लालबागचा राजा मंडळाला 2.5 कोटींचे विमा संरक्षण मिळणार आहे.

5/7

लालबागचा राजा मंडप परिसरात अपघात झाल्यास किंवा दुर्घटना घडल्यास 12 कोटींचं विमा संरक्षण मिळणार आहे. 

6/7

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळा फक्त दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा विमा उतरवला आहे. 24 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर दरम्यान हे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. 

7/7

 लालबागचा राजा मंडळाने तब्बल  26.5 कोटींचे विमा संरक्षण घेतले आहे. यासाठी मंडळाने  5 लाख 40 हजारांचा विमा हप्ता भरला आहे. मंडळाने न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनीकडून  हा विमा उतरवला आहे.