Krishna Butter Ball : श्रीकृष्णाचा रहस्यमय दगड! 7 हत्तीची ताकदही त्याचा समोर फेल; आजही भारतात ‘या’ ठिकाणी उभा आहे थाटात

Krishna Butter Ball : जगाच्या पाठीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं रहस्य आजही शास्त्रज्ञ शोधू शकले नाहीत. अशात एक दगड आहे,  ज्याच रहस्य आजही उलगडण्यात शास्त्रज्ञ फेल ठरले आहेत.

नेहा चौधरी | Feb 07, 2025, 21:46 PM IST
1/7

हा आश्चर्यकारक दगड दक्षिण भारतातील चेन्नई नावाच्या शहरातील महाबलीपूरमध्ये आहे. त्याला कृष्णा बटर बॉल म्हणून ओळखला जातो. 

2/7

हा एक महाकाय दगड असून रहस्यमय दगदाच एका टेकडीच्या उतारावर 45 अंशांच्या कोनात उभा असून तो कधीही खाली प़डत नाही. 

3/7

इथले स्थानिक लोक या दगडाबद्दल त्यांची स्वत:ची एक आस्था आहे. ते सांगतात की, हा दगड म्हणजे कृष्णाचा आवडत्या लोणीचे प्रतीक आहे.  जो सर्वागतूनच इथे पडला आहे. 

4/7

हा दगड 20 फूट उंच आणि 5 मीटर रुंद असून याचं वजन अंदाजे 250 टन एवढं आहे. या दगडाबद्दल भौतिकशास्त्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना झुगारून देतोय, या दगडाचे अस्तित्व आजही गूढ कायम आहे. 

5/7

या दगडाबद्दल असंही सांगण्यात येतं की, दक्षिण भारतावर राज्य करणाऱ्या पल्लव राजवंशाच्या राजाने हा दगड इथून काढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे प्रयत्नला यश आलं नाही. 

6/7

त्यानंतर 1908 मध्ये मद्रासचे गव्हर्नर आर्थर यांनी ते हटवण्याचे आदेश दिले होते. तेव्हा हा दगड हटविण्यासाठी 7 हत्ती कामावर लावले होते. पण हा दगड आजही तिथे थाटात उभा आहे. 

7/7

कृष्ण बटर बॉल आता पर्यटकाचं आकर्षण बनलं असून दरवर्षी हजारो लोक त्याला भेट देण्यासाठी येतात. पर्यटकही या दगडाला ढकलून खाली पाडण्याचा प्रयत्न करता. पण हा तो दगड पावसाळा, वाराचा मार सहन करत तिथे उभा आहे.