21 वर्षांपूर्वीचा 'हा' चित्रपट, ज्यात होते सर्वात जास्त Kissing सीन, बजेटपेक्षा तीनपट जास्त केली होती कमाई

सध्याच्या चित्रपटांमध्ये किसिंग आणि बोल्ड सीन्स सर्रास दाखवले जातात. परंतु काही वर्षांपूर्वी असं नव्हतं. पूर्वी जेव्हा चित्रपट पाहताना त्यात किसिंग किंवा बोल्ड सीन्स यायचे तेव्हा लोकं डोळे बंद करायची किंवा चॅनल बदलायची. तेव्हा आज तुम्हाला 21 वर्षांपूर्वीच्या अशा एका बॉलिवूड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्याने त्यावेळी किसिंग आणि बोल्ड सीन्सच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. 

Pooja Pawar | Feb 07, 2025, 18:23 PM IST
1/7

मागील काही वर्षांमध्ये चित्रपट सृष्टीत अनेक बदल झाले आहेत. यांमध्ये ऍक्शन चित्रपटांपासून रोमान्स पर्यंत सर्वकाही समाविष्ट असतं. याशिवाय आधी किसिंग आणि बोल्ड सीन टाळले जायचे, पण आजकाल अशा सीन्स शिवाय चित्रपट पूर्णच होत नाही. 

2/7

तुम्हाला 21 वर्षांपूर्वींच्या अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्यात एवढे किसिंग आणि बोल्ड सीन्स होते जे पाहून सर्वच हैराण झाले. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुरळा उडवून दिला होता. हा चित्रपट बघितल्यावर अनेक जणांचं म्हणणं होतं की या चित्रपटाच्या गोष्टीपेक्षा जात जास्त इंटिमेट सीन्स आहेत. हा चित्रपट त्यावर्षाचा सर्वात हिट चित्रपट ठरला होता.   

3/7

सदर चित्रपट हा अनुराग बसुने दिग्दर्शित केला होता. यात इमरान हाशमीअश्मित पटेल आणि मल्लिका शेरावत सारखे कलाकार होते. या चित्रपटाने मल्लिकाला रातोरात स्टार बनवले. अभिनेत्रीने या चित्रपटात एवढे बोल्ड सीन्स दिले होते की ते पाहून सर्वच हैराण झाले. परंतु यासाठी तिला अनेक टीका देखील सहन कराव्या लागल्या होत्या. 

4/7

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. आज सुद्धा या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षक खूप पसंत करतात. या चित्रपटाची गोष्ट सुद्धा चांगली होती. 

5/7

चित्रपटाची गोष्ट ही लव ट्रायंगलवर आधारित होती. जिथे एक विवाहित जोडपं (मल्लिका-अश्मित) एकत्र राहत असतात, परंतु एकमेकांसोबत खुश नसतात. दरम्यान यात पत्नीचं अफेअर दुसरा पुरुष (इमरान) सोबत होतं. जेव्हा तिच्या पतीला समजलं तेव्हा तो इमरानला मारून टाकतो. त्यानंतर चित्रपटाची गोष्ट वेगळं वळण घेते. 

6/7

मर्डर असं या चित्रपटाचं नाव होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाचं बजेट 5 कोटी होतं ज्याने बॉक्स ऑफिस 22.49 कोटींची कमाई केली होती. 

7/7

अभिनेत्री मल्लिका शेरावतला या चित्रपटात दिलेल्या बोल्ड सीन्समुळे खूप ट्रोल केलं गेलं. त्यानंतर ती हळूहळू चित्रपट सृष्टीपासून दूर होतं गेली. 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या 'विक्की विद्या का वो वाला वीडियो' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मल्लिका शेरावतने सांगितले की, 'मर्डर चित्रपटाने मला रातोरात स्टार स्टारडम दिले होते. लोकं मला वाईट नजरेने बघायचे. मी केलेल्या कृत्याची मला लाज वाटावी अशी लोकांची इच्छा होती. मी रडून महेश भट्ट यांच्याकडे गेले होते. तेव्हा ते म्हणाले याबाबत दुःख करण्याची गरज नाही तुला जे यश मिळालंय त्याचा आनंद घे'.