बजेटपेक्षा 12 पट अधिक कमाई, रश्मिका मंदानाचा 'हा' चित्रपट 9 वर्षांपूर्वी झाला होता प्रदर्शित

9 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाने केली होती बजेटपेक्षा 12 पट अधिक कमाई. 

Soneshwar Patil | Feb 07, 2025, 15:46 PM IST
1/8

अभिनेत्री रश्मिका मंदानाने साऊथसह बॉलिवूडमध्येही एक खास ओळख निर्माण केली आहे. लवकरच ती सलमान खानच्या सिकंदर चित्रपटात दिसणार आहे.

2/8

2024 मध्ये अभिनेत्रीचा 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. 

3/8

एवढेच नाही तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली. चित्रपटाने कमाईमध्ये अनेक मोठ-मोठ्या चित्रपटांना मागे टाकून नवीन रेकॉर्ड बनवला.

4/8

'पुष्पा' चित्रपटातून रश्मिका मंदानाला अधिक लोकप्रियता मिळाली. मात्र, तिच्या 'किरिक पार्टी' या पहिल्या चित्रपटामुळे तिचे नशीब अधिक चमकले. 

5/8

2016 मध्ये रश्मिका मंदानाने तिच्या चित्रपट कारकि‍र्दीला सुरुवात केली. या चित्रपटातून तिला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 

6/8

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदानासोबत रक्षित शेट्टी मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट विद्यार्थी जीवनातील कथांवर आधारित आहे. 

7/8

'किरिक पार्टी' हा चित्रपट अगदी कमी बजेटमध्ये बनवला होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने बजेटपेक्षा 12 पट अधिक कमाई केली होती. 

8/8

चित्रपटादरम्यान, रश्मिका मंदाना आणि रक्षित यांच्या नात्यांची सुरुवात झाली. ही गोष्ट इंगेजमेंटपर्यंत पोहोचली.  परंतु, अशातच दोघेही वेगळे झाले.