तिच्या नावानंच उडतो साऱ्या देशाचा थरकाप; पाहा कोण आहे जगातील सर्वात क्रूर महिला?

Most Powerful Woman in North Korea: फोटो पाहून अनेकांना लक्षातही येत नाही या महिलेचा हुद्दा. ती आहे तरी कोण? साऱ्या जगात तिची ओळख म्हणजे, सर्वात क्रूर महिला. 

Sayali Patil | Feb 07, 2025, 14:43 PM IST

Most Powerful Woman in North Korea: जागतिक पटलावर अनेक असे चेहरे आहेत ज्यांच्याविषयी कायमच कुतूहल पाहायला मिळतं. 

1/7

उत्तर कोरिया

most dangerous woman in world kim jong un sister kim yo jong

Kim Jong Un Sister Kim Yo Jong : उत्तर कोरिया... जगाच्या नकाशातील एक असा देश, ज्याचं नाव घेतलं तरीही तिथं असणारे चित्र विचित्र कायदे डोळ्यांसमोर येतात. इथं असणारी हुकूमशाही कोणापासूनच लपलेली नाही, कारण इथं सत्ता आहे ती म्हणजे सर्वात क्रूर शासक किम जोंग उनची.   

2/7

हुकूमशहा

most dangerous woman in world kim jong un sister kim yo jong

हुकूमशहा किम जोंग उनची बहीण किम यो जोंग हीसुद्धा त्याच्याचप्रमाणं तिच्या कठोर आणि क्रूर आदेशांसाठी ओळखली जाते. उत्तर कोरियातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून ती ओळखली जाते.

3/7

गुपितं

most dangerous woman in world kim jong un sister kim yo jong

'द सिस्टर: एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी ऑफ किम यो जोंग' या पुस्तकामध्ये तिच्याविषयीची अनेक गुपितं जगासमोर आली आहेत. उत्तर कोरियाच्या राजकारणाला अतिशय जवळून पाहणाऱ्या संग यून ली यांनी या पुस्तकात देशाच्या राजकारणात या महिलेचा उदय नेमका कसा झाला याची माहिती दिली आहे. 

4/7

किम यो जोंग

most dangerous woman in world kim jong un sister kim yo jong

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये किम यो जोंगला किम जोंग उन यांची उत्तराधिकारी म्हणून संबोधलं जातं. यो जोंग लहानपणापासून तिच्या वडिलांसोबतच जास्त वेळ घालवत. 

5/7

शालेय शिक्षण

most dangerous woman in world kim jong un sister kim yo jong

लहानपणापासूनच ती अतिशय हुशार होती. तिचं शालेय शिक्षण स्वित्झर्लंडमधून झाल्याचं म्हटलं जातं. पण, याची अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. असंही म्हणतात की तिथं तिचं नाव, कागदोपत्री पुरावेही बदलण्यात आले होते. 

6/7

यो जोंग

most dangerous woman in world kim jong un sister kim yo jong

यो जोंग सर्व भावंडांमध्ये सर्वात लहान असून, सर्वात जास्त हुशारही आहे. इंग्रजी आणि जर्मन भाषांमध्ये तिला प्रभुत्त्व आहे. असं म्हटलं जातं की, जर यो जोंग सत्तेत आली तर ती आपल्या भावापेक्षा क्रूर निर्णय घेऊ शकते. 

7/7

क्रूर निर्णय

most dangerous woman in world kim jong un sister kim yo jong

काका आणि कुटुंबातील इतर काही सदस्यांच्या हत्येमागेची तिचा हात असल्याचं म्हटलं जातं. दक्षिण कोरियातील गुप्तचर यंत्रणांच्या मते किम जोंग उनपेक्षाही यो जोंग अधिक शक्तिशाली आणि क्रूर ठरत आहे. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)