उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!

Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता. 

| Apr 03, 2023, 18:03 PM IST
1/5

ताक

ताक

ताकामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास वजन झपाट्याने कमी होते.  

2/5

लिंबू

Lemon

Lemon: लिंबू नैसर्गिक पद्धतीने शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. उन्हाळ्यात ते शरीराला हायड्रेट करते आणि चरबी कमी करण्यास देखील मदत करते. यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचे नियमित सेवन करू शकता.

3/5

दही

Dahi

दही पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आह. तुम्ही वजन कमी करण्यासाठी देखील याचे सेवन करू शकता. पचनशक्ती वाढवण्यासोबतच यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स फॅट्स कमी करण्यासही मदत करतात. याच्या वापरामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळा.  

4/5

कारले

Karela

कारल्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आढळतात. यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय त्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळतात. याचे नियमित सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होऊ शकतो.

5/5

कलिंगड

Water Melon

Watermelon: टरबूज आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, पोटॅशियम, लोह यांसारखे पोषक घटक आढळतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात. यामुळे शरीराला पाण्याचा पुरवठा होतो. तसेच ते खाल्ल्याने पोट भरते आणि वारंवार भूक लागत नाही. अशावेळी ते वजन कमी करण्यास मदत करते. तुम्हाला हवं असेल तर सलाड म्हणूनही खाऊ शकता.