Jaya Prada Birthday : पहिल्या चित्रपटात 10 रुपये मानधन, आता कोट्यवधींची कमाई... अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास

Jaya Prada Birthday : बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी जया प्रदा यांचा आज वाढदिवस आहे. आज जया प्रदा या त्यांचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया प्रदा यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. जया प्रदा यांनी बालपणी अभिनय क्षेत्रातून त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. आज त्यांच्याविषयी आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.   

| Apr 03, 2023, 15:36 PM IST
1/7

Jaya Prada Birthday net worth

जया प्रदा यांचं खरं नाव ललिता रानी असं आहे. त्यांचा जन्म हा आंध्र प्रदेशच्या राजमुंदर या गावी झाला होता. जया या मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्या होत्या.

2/7

Jaya Prada Birthday net worth

जया प्रदा यांचे वडील कृष्णा तेलुगू हे चित्रपट डिस्ट्रीब्युटर आहेत. आज कोटींच्या संपत्तीच्या मालकीन असलेल्या जया प्रदा यांना करिअरच्या सुरुवातीला 10 रुपये मानधन म्हणून घेतले होते.   

3/7

Jaya Prada Birthday net worth

जया प्रदा यांनी वयाच्या 14 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. त्यांना करिअरमधली पहिली संधी ही त्यांच्या डान्समुळे मिळाली होती. जया यांनी एका कार्यक्रमात डान्स केला होता. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यानं त्यांना पाहिलं आणि 'भूमि कोसम' या चित्रपटात डान्स करण्यास सांगितले. 

4/7

Jaya Prada Birthday net worth

जया प्रदा यांनी वडिलांना विचारून चित्रपटात काम करण्यास होकार दिला. अशात त्यांना 10 रुपये मानधन म्हणून मिळाले होते. तर आज त्यांच्याकडे 18 कोटींच्या आजपास संपत्ती असल्याचं म्हटलं जातं. 

5/7

Jaya Prada Birthday net worth

जया प्रदा यांनी त्यानंतर 1979 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर सरगम हा त्यांचा पहिला चित्रपट होता. जया प्रदा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढली आणि त्यांचे नाव हे लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत येऊ लागले होते.   

6/7

Jaya Prada Birthday net worth

जया प्रदा यांनी राजकारणात त्यांचे नशिब आजमवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी तेलुगू देशम पार्टी जॉइन केली. काही मतभेद झाल्यानंतर त्यांनी ती पार्टी सोडली आणि समाजवादी पार्टीचा भाग होण्याचे ठरवले.   

7/7

Jaya Prada Birthday net worth

2004 मध्ये जया प्रदा यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि इतकंच नाही त्या जिंकल्या. त्यानंतर, जया यांनी 2019 मध्ये समाजवादी पार्टी सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. (All Photo Credit : Jaya Prada Instagram)