शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतील हे '5' पदार्थ
Apr 08, 2018, 13:05 PM IST
1/6
लसूणामध्ये शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे हृद्यविकाराचा धोका कमी होतो. रक्ताच्या क्लॉटिंग होण्याच्या प्रक्रियेलाही चालना मिळते.
2/6
ब्लॅक टी, ग्रीन टी चा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. यामध्ये असणारे अॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असल्याने आरोग्याला त्याचा फायदा होतो. वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच रक्ताच्या क्लॉटिंंग करण्याच्या प्रक्रियेलाही चालना मिळते.
TRENDING NOW
photos
3/6
दिवसाची सुरूवात फळाने करणेही फायदेशीर आहे. संत्र्याचा आहारात समावेश केल्यास कोलेस्टेरॉलचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते. संत्र्यातील व्हिटॅमिन सी आरोग्याला पोषक आहे.
4/6
राजमा - राजम्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, वाईट कोलेस्टेरॉलचा धोका कमी होतो. तसेच त्यामध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पचनाची क्रियादेखील सुधारते.
5/6
सफरचंदामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं सोबतच वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
6/6
शरीरात चांंगले आणि वाईट दोन्ही स्वरूपाचे कोलेस्टेरॉल असतात. मात्र वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं की हृद्यविकार, रक्तदाबाच्या समस्या वाढतात. म्हणूनच त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं हे फयदेशीर ठरते.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link