सुपरस्टार असूनही चाळीमध्ये राहायचा 'हा' अभिनेता? दिग्दर्शक बाथरुमबाहेर...

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार यश मिळताच सर्वप्रथम त्यांची जीवनशैली बदलतात, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जो सुपरस्टार झाल्यानंतरही चाळीत राहत होता.

Soneshwar Patil | Feb 01, 2025, 15:13 PM IST
1/7

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, जे सुपरस्टार होताच आपली जीवनशैली बदलतात. ज्याप्रमाणे चाहते सलमान खानला भाई जान आणि शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखतात. 

2/7

परंतु, इंडस्ट्रीमध्ये 70 च्या दशकातील एक असा आहे ज्याचा प्रभाव अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये हिट झाल्यानंतरही हा अभिनेता चाळीत आयुष्य जगत होता.

3/7

तिथेच या अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक रांगा लावत असायचे. या अभिनेत्याचे नाव आहे जॅकी श्रॉफ. 

4/7

अभिनेता जॅकी श्रॉफने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. एक काळ असा होता की अभिनेत्याला चाहत्यांनी खलनायक म्हणून पसंती दिली होती. 

5/7

जॅकी श्रॉफचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि त्यांचे संपूर्ण बालपण तीन बत्ती परिसरात गेले. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अभिनेता नोकरीच्या शोधात होता हे फार कमी चाहत्यांना माहीत आहे.

6/7

1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिरो' या चित्रपटाने जॅकी श्रॉफला स्टार बनवले. 'हिरो' चित्रपटाच्या यशानंतरही अभिनेत्याने आपले घर आणि ठिकाण बदलले नाही. 

7/7

अभिनेता त्याच चाळीत राहत होता आणि त्यामुळेच दिग्दर्शकांना जॅकीशी बोलण्यासाठी चाळीत यावे लागत होते.