Budget 2025: तुमच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बजेटमधील 10 सर्वात मोठ्या घोषणा

Pravin Dabholkar | Feb 01, 2025, 13:09 PM IST
1/11

Budget 2025: सर्वसामांन्यांवर परिणाम करणाऱ्या बजेटमधील 10 सर्वात मोठ्या घोषणा

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प जाहीर केला. नोकरदारवर्गापासून आरोग्य क्षेत्रापर्यंत विविध योजना जाहीर करण्यात आल्या. सर्वसामांन्यावर परिणाम करणाऱ्या 10 महत्वाच्या घोषणांबद्दल जाणून घेऊया. 

2/11

12 लाखांपर्यतचं उत्पन्न करमुक्त

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. यामुळे नोकरदार वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. 18 लाखांच्या उत्पन्नावर 70 हजारांची सूट आणि 25 लाखांच्या उत्पनावर 1 लाख 20 हजारांची सूट मिळणार आहे. दरम्यान निर्मला सीतारमण यांनी पुढील आठवड्यात आयकर विधेयक येणार असल्याचं जाहीर केलं आहे. 12 लाखांपर्यंतची सूट फक्त नोकरदार वर्गाला आहे. पण जर याव्यतिरिक्त गुंतवणुकीतून कमाई होत असेल तर त्यांना ही सूट मिळणार नाही.  80 लाख उत्पन्न असल्यास 70 हजार आणि 25 लाख असल्यास 1 लाख 10 हजारांची कर सवलत मिळेल. 

3/11

देशात 200 नवे डे केअर कॅन्सर सेंटर

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प 2025 मध्ये आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासंदर्भात अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले. देशात 200 नवे डे केअर कॅंन्सर सेंटर उभारले जातील. ज्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराशी लढताना नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू शकतील, असे यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या. कस्टम ड्युटीतून 36 औषध वगळण्यात आली असून कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत.

4/11

एक्स्पोर्ट क्षेत्राला गती

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

HEAL इन इंडिया अंतर्गत व्हिसा नियम सुकर करणार. एक्सपोर्ट प्रमोशन मिशन सुरु करणार. एक्सपोर्ट अर्थात आयात निर्यात वाढवण्यासाठी MSMEs ना सोप्या प्रक्रियेतून कर्ज दिलं जाणार. ट्रेड फायनान्ससाठी भारत ट्रेड नेटची स्थापना. वेयरहाउस, पोर्ट इंफ्रा क्षेत्रांना बळकटी देणार. 

5/11

SC/ST प्रवर्गातील महिलांसाठी विशेष योजना

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी SC/ST प्रवर्गातील महिलांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. पाच वर्षांसाठीच्या या योजनेअंतर्गत महिलांना मदत मिळणार असून, ₹10,000 कोटींचा नवा फंड ऑफ फंड्स तयार होईल. 

6/11

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आल्याची घोषणा केली. इथून पुढं KCC ची मर्यादा 3 लाखांवरून वाढवून 5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना यामुळं थेट लाभ घेता येणार.

7/11

स्थानिक भाषांमधील पुस्तकांना प्राधान्य

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री सीतारमण यांनी भारतातील विविध भारतीय भाषांमधील पुस्तकांना प्राधान्य देणार असल्याचं जाहीर केलं. ग्रामीण प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये इंटरनेट सुविधा सुरु करणार असल्याची घोषणा. IIT ची संख्या वाढवणार. AI क्षेत्रात सेंटर ऑफ एक्सीलेंस सुरु करणार. 

8/11

. फुटवेअर आणि चर्मोद्योग क्षेत्र

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

देशात लेबर इंटेंसिव सेक्टर अंतर्गत प्रोत्साहनपर नव्या योजना सुरु करणार असल्याचं सीतारमण यांनी जाहीर केलं. फुटवेअर आणि चर्मोद्योग क्षेत्रासाठी खास योजनेची तरतूद. सदर योजनेअंतर्गत 22 लाखांहून अधिक नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार. खेळण्यांच्या उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर भारत एक केंद्र म्हणून विकसित होणार.

9/11

लघु उद्योग, कंपन्यांना विशेष क्रेडिट कार्ड

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

कोऑपरेटिवच्या मदतीनं NCDC ला आर्थिक पाठबळ देणार. MSME मध्ये गुंतवणुकीसह एकूण मालमत्तेत 2.5 पटींनी वाढ होणार.  लघुउद्योगांना विशेष क्रेडिट कार्ड देणार. स्टार्टअपसाठी विशेष 20 कोटी रुपयांचं क्रेडिट गॅरंटी कव्हर मिळणार.

10/11

कस्टम ड्यूटी आणखी कमी

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

ओपन सेलवरील कस्टम ड्यूटी आणखी कमी होणार. जहाजबांधणीसाठीच्या कच्च्या मालावरील अबकारी करात घट. क्रस्ट लेदरवरील आयातशुल्क हटवलं. 

11/11

महिलांसाठी विशेष योजना

Budget 2025 10 biggest announcements in the budget that will impact the common man

मागासवर्गीय विभागातील महिलांसाठी एका खास योजनेची सुरुवात करणार. बिहारमध्ये फूड टेक्नोलॉजी आणि व्यवस्थापकीय संस्थेची सुरुवात करणार. नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग योजनेची सुरुवात करणार. सक्षम अंगणवाडी आणि POSHAN 2.0 ची सुरुवात करणार.