तुकडाबंदी कायद्यात मोठा बदल; 10 गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा
राज्यातील शेतकरी आणि जमीन खरेदी-विक्री करणा-यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात लवकरच तुकडाबंदी कायद्यात शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात 10 गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा होणार आहे.
Land Laws In Maharashtra : जमीन खरेदी-विक्रीतल्या किचकट नियमांमुळे जमीनमालक आणि खरेदीदारासमोर येणा-या अडचणी आता दूर होणार आहेत. महसूल विभागानं तुकडाबंदी कायद्यात अंशत: फेरबदल करून नवी अधिसूनचा जारी केलीय. त्यानुसार 20 गुंठे जिरायती आणि 10 गुंठे बागायती जमिनीच्या खरेदी-विक्रीला परवानगी देण्यात आलीय. तुकडाबंदी कायद्यामुळं गुंठेवारीवर जमीन विक्री तसंच खरेदीची दस्त नोंदणी करता येत नव्हती. अलिकडच्या काळात कुटुंबातील सदस्य संख्या वाढल्यानं जमीन धारणा क्षेत्र बदललंय. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मालकी हक्क मिळणं गरजेचं आहे. त्यामुळेच महसूल विभागानं तुकडाबंदी कायद्याबाबत मोठा बदल केला आहे.