25 वर्षांच्या कारकि‍र्दीत सर्वाधिक फ्लॉप चित्रपट, तरीही 280 कोटींचा मालक, कोण आहे हा अभिनेता?

इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपट करिअर निवडले. पण असा एक अभिनेता आहे, ज्याने आतापर्यंत सर्वाधिक फ्लॉप चित्रपट दिलेत. 

Soneshwar Patil | Feb 05, 2025, 12:41 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेता

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा काही कलाकारांबद्दल सांगणार आहेत, ज्यांनी आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपट करिअर निवडले.  

2/7

कारकि‍र्दीत

या अभिनेत्याने कारकि‍र्दीत अनेक चित्रपट केले आहेत. परंतु, ज्यामध्ये सर्वाधिक फ्लॉप चित्रपटांचा समावेश आहे. या अभिनेत्याला इंडस्ट्रीतमध्ये येऊन 25 वर्षे झाली आहेत. 

3/7

अभिषेक बच्चन

25 वर्षांच्या करिअरमध्ये अभिनेत्याने फक्त काहीच हिट चित्रपट दिले आहे. जे प्रेक्षकांना प्रचंड आवडले. या अभिनेत्याचे नाव अभिषेक बच्चन आहे. 2000 मध्ये त्याने 'रिफ्यूजी' या चित्रपटातून पदार्पण केले होते. 

4/7

फ्लॉप चित्रपट

या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूरनेही पदार्पण केले होते. हा चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर फ्लॉप चित्रपटांची मालिका सुरु झाली. हिट चित्रपटासाठी अभिनेत्याने खूप संघर्ष केला. 

5/7

हिट चित्रपट

2000 ते 2006 दरम्यान अभिनेत्याने अंदाजे 23 चित्रपट केले, त्यापैकी 16 चित्रपट फ्लॉप झाले. संघर्षामध्ये अभिनेत्याचा 'धूम' चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला. तो हिट ठरला. 

6/7

एकूण संपत्ती

जरी अभिनेत्याच्या नावावर फ्लॉप चित्रपटांचा विक्रम असला तरी अभिनेता आज कोट्यावधींचा मालक आहे. अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती सुमारे 280 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 

7/7

यशस्वी उद्योजक

 अलीकडेच, त्याचा ‘I Want to Talk’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला. परंतु, अभिषेक बच्चनने स्वत:ला एक यशस्वी उद्योजक म्हणून स्थापित केले आहे. आज तो 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.