दिलीप कुमार ते ए. आर. रेहमान हा प्रेरणादायी प्रवास

Jan 06, 2018, 14:57 PM IST
1/10

AR Rahman

AR Rahman

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान आज ५२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म चैन्नईत झाला. वडिलांकडून त्यांना संगीताचा वसा मिळाला. ए. आर . रेहमान  ९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या अकाली निधनाने त्यांची आर्थिक स्थिती खालावली होती. 

2/10

AR Rahman

AR Rahman

पैशांच्या तुटवड्यामुळे रेहमान कुटुबंबियांना काही वाद्य विकावी लागली होती. ११ वर्षाच्या रेहमान यांनी त्यांचा मित्र शिवमणीसोबत बॅन्ड सुरू करून त्यामध्ये सिंथे सायझर वाजवायला सुरूवात केली. दरम्यान रेहमान  यांना लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून स्कॉलरशिप मिळाली. याद्वारा त्यांनी पाश्चात्य संगीताचे शिक्षण घेतले 

3/10

AR Rahman

AR Rahman

रेहमानच्या मते, सिंथेसायझर हा कला आणि टेक्नोलॉजीचा अदभुत मिलाफ आहे. त्यांना सिंथेसायझरसोबत हार्मोनियम, की बोर्ड, पियानो, गिटार देखील वाजवता येते. रेहमान यांचे मूळ नाव दिलीप कुमार होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार रेहमान यांची आई सुफी संत   करीमुल्लाह शाह कादरी यांची भक्त होती. त्या मूळच्या हिंदू धर्माच्या होत्या. 

4/10

AR Rahman

AR Rahman

धर्म परिवर्तनाबबात बोलताना रेहामान यांनी दिलेल्या माहितीनुसार, " वडिलांच्या निधनानंतर १० वर्षांनी त्यांनी आईसह कादरींची भेट घेतली होती. अस्वस्थ असणार्‍या कादरींची आई काळजी घेत असे. ते तिला त्यांची मुलगी मानत असतं." यादरम्यान त्यांच्यामध्ये उत्तम कनेक्शन तयरा झाले. त्यावेळेस रेहमान १९ वर्षांचे होते. 

5/10

AR Rahman

AR Rahman

रेहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कादरींना भेटल्यानंतर रेहमान कुटुंबियांसह कोदाम्बक्कमला रहायला गेले. सुुफीझम भावल्यानंतर त्याची रेहमान यांनी कास धरली.  

6/10

AR Rahman

AR Rahman

 रेहमान यांंच्या पत्नीचे नाव सायरा बानू आहे. त्यांना तीन अपत्य आहेत. दक्षिण सिनेसृष्टीतील कलाकार राशिन रेहमान यांंचे ते कुटुंबिय आहेत. 

7/10

AR Rahman

AR Rahman

१९९२ साली आलेल्या 'रोजा' चित्रपटासोबत रेहमान यांचा हिंदी सिनेसृष्टीतील कारकीर्द सुरू झाली. शास्त्रीय संगीताचा गाभा सांभाळत  त्यांनी गाण्यांमध्ये, आवाजांमध्ये ब्दल घडवून आणले. 

8/10

AR Rahman

AR Rahman

बॉलिवूड गाण्यांना एआर रेहमान यांनी नवसंजीवनी दिली. त्यांनी हिंदी गाण्यांना पाश्चत्य संगीताचा साज चढवला. 

9/10

AR Rahman

AR Rahman

२०१० साली सरोद वादक अमजद अली आणि ए आर रेहमान यांना ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतातील पुरस्कारांप्रमाणेच ग्रॅमी, ऑस्कर, बाफ्टा आणि  गोल्डन ग्लोब पुरस्कारांवर रेहमान यांनी मोहोर उमटवली आहे. 

10/10

AR Rahman

AR Rahman

ए. आर. रेहमान यांनी नेहमीच सकारत्मक टीकेचा स्विकार केला. त्यांंच्यावर केलेल्या टीकेतून ते अधिक समृद्ध झाले. मात्र कित्येक वर्षांचा लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव असूनही ए आर रेहमान आजही रसिकांंच्या गर्दी समोर जायला  घाबरतात.