1100 चित्रपटांमध्ये काम, 'हा' विनोदी कलाकार रजनीकांतपेक्षाही श्रीमंत, नेटवर्थ पाहून उडतील होश

साउथमधील या अभिनेत्याने आतापर्यंत 1100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज त्याची एकूण संपत्ती रजनीकांतपेक्षा जास्त आहे. कोण आहे हा अभिनेता? जाणून घेऊयात सविस्तर

Soneshwar Patil | Feb 05, 2025, 17:39 PM IST
1/7

साउथ अभिनेता

सध्या चाहत्यांमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांबाबत प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. यामध्ये थलापति विजय, अल्लू अर्जुन, विजय सेतुपती, रजनीकांत यांसारख्या कलाकारांची नावे समोर येतात. 

2/7

1100 चित्रपट

परंतु,एक असा कलाकार आहे, ज्याने 1100 चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आपल्या विनोदाने सर्वांना वेड लावले आहे. आम्ही तुम्हाला कॉमेडियन ब्रह्मानंदम  यांच्याबद्दल बोलत आहोत. 

3/7

69 वा वाढदिवस

नुकताच ब्रह्मानंदम  यांनी त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांचा जन्म हा आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात झाला आहे. त्यांचे बालपण खूप आर्थिक अडचणीत गेले. 

4/7

मिमिक्री

सध्या ते केवळ कोट्यावधींच्या मालमत्तेचे मालक राहिले नसून त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांना देखील मागे टाकले आहे. त्यांनी एम. ए शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी मिमिक्री करून मोठा चाहता वर्ग बनवला. 

5/7

पहिला चित्रपट

येथूनच त्यांच्या अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात झाली. त्यांच्यासाठी चित्रपट इंडस्ट्री ही पूर्णपणे नवीन होती. त्यांनी पहिला चित्रपट 'अहा ना पेलंटा'  हा केला.  

6/7

अनेक चित्रपट

चिरंजीवी यांना या चित्रपटातील ब्रह्मानंदम यांचे काम आवडले. त्यानंतर ब्रह्मानंदम यांनी प्रत्येक चित्रपटात कास्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 

7/7

नेटवर्थ

त्यांनी वेगवेगळ्या भाषांमधील तब्बल 1100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. त्यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये इतकी आहे. तर रजनीकांत यांची 450 कोटी रुपये इतकी आहे.