मध्यमवर्गीय लोकांचं स्वप्न पूर्ण होणार! भारतातील सर्वात स्वस्त 5 कार, किंमत फक्त...

जर तुम्हाला स्वस्त आणि विश्वासार्ह कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त कारची यादी येथे सांगणार आहोत.

Soneshwar Patil | Feb 05, 2025, 18:05 PM IST
1/7

कुटुंबासाठी स्वस्त कार

भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी परवडणाऱ्या आणि बजेटमधील कार शोधणे सध्या खूपच कठीण होत चालले आहे. जबरदस्त मायलेज, चांगले फीचर्स असणारी कार प्रत्येकाला हवी असते.   

2/7

सर्वात स्वस्त कार

आज आम्ही तुम्हाला अशाच भारतातील सर्वात स्वस्त पाच कारबद्दल सांगणार आहेत. ज्यांची किंमत 5 लाखांच्या आतमध्ये आहे. जाणून घेऊयात सविस्तर 

3/7

टाटा नॅनो

टाटा नॅनो ही भारतातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली जाते. सध्या तिचे उत्पादन बंद झाले आहे. परंतु, जर तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही कार उत्तम पर्याय असू शकते. या कारची सुरुवातीची किंमत 1 ते 1.5 लाख रुपये होती.

4/7

रेनॉल्ट क्विड

रेनॉल्ट क्विड ही कार देखील भारतीय बाजारपेठेत परवडणारी आणि स्टायलिश कार आहे. आकर्षक डिझाइन, चांगले इंटीरियर आणि मायलेज देणाऱ्या कारची किंमत 4.50 लाख रुपये आहे. 

5/7

मारुती सुझुकी अल्टो 800

मारुती सुझुकी अल्टो 800 ही कार देखील भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. जबरदस्त मायलेज आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही सर्वोत्तम पर्याय आहे. कारची सुरुवातीची किंमत 3.54 लाख रुपये आहे. 

6/7

मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार देखील एसयूव्ही स्टाईलमध्ये येते. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही उत्तम कार आहे. या कारची किंमत 4.25 लाख रुपये एक्स-शोरुम किंमत आहे. 

7/7

डैटसन गो

डैटसन गो ही कार देखील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी उत्तम आहे. चांगली ड्रायव्हिंग आणि स्टायलिश डिझाइनसह ही कार येते. या कारची एक्स-शोरुम किंमत 4.3 लाख रुपये आहे.