21 वर्षांच्या करिअरमध्ये फक्त 5 चित्रपट, एकही हिट नाही, टॉप अभिनेत्रीसोबत केलं लग्न, आज 200 कोटींचा मालक

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी टीव्हीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यांना मोठ्या पडद्यावर लोकप्रियता मिळाली नाही. 

Soneshwar Patil | Feb 23, 2025, 14:28 PM IST
1/7

दिल्लीमधील पंजाबी शीख कुटुंबातील या अभिनेत्याचे बालपण हे सऊदी अरबमध्ये गेले. तेथूनच त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तो मुंबईत आला आणि त्याने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली. 

2/7

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अभिनेत्याने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी हॉटेल क्षेत्रात मार्केटिंग एग्जीक्यूटिव म्हणून काम केलं आहे. परंतु त्याचे स्वप्न मनोरंजन जगात काम करण्याचे होते. 

3/7

आम्ही अभिनेता करण सिंह ग्रोवर याच्याबद्दल बोलत आहोत. आज तो त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने अभिनय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. 

4/7

करण सिंह ग्रोवरने त्याच्या करिअरची सुरुवात एकता कपूरच्या टीव्ही शो 'कितनी मस्त है जिंदगी' मधून केली. मात्र, त्याला खरी ओळख 'दिल मिल गए'मधून मिळाली. 

5/7

त्यानंतर त्याने 'कबूल है' अशा अनेक हिट टीव्ही शोमध्ये काम केलं. त्यानंतर तो छोट्या पडद्यावरील मोठा स्टार बनला. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, त्याला यश मिळालं नाही. 

6/7

त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्याचे चित्रपट फ्लॉप ठरले. अभिनेत्याने त्याच्या 21 वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत एकही सोलो हिट चित्रपट दिला नाही. 

7/7

अभिनेत्याने 2016 मध्ये बिपाशा बासूसोबत लग्न केलं. हे त्याचं तिसरं लग्न होतं. त्यावेळी बिपाशा टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. सध्या करण सिंह ग्रोवर जवळपास 224 कोटींचा मालक आहे.