रोहित किंवा विराट नाही, 'या' भारतीयाने ICC चॅम्पियन्स ट्रॉफीत ठोकलेत सर्वाधिक सिक्स

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स मारण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत कोणत्या खेळाडूंची नावं आहेत? जाणून घ्या सविस्तर. 

Feb 23, 2025, 12:48 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स मारण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत कोणत्या खेळाडूंची नावं आहेत? जाणून घ्या सविस्तर. 

1/10

सौरव गांगुली

सौरव गांगुली हा भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम गांगुलीच्या नावावर आहे. 13 सामन्यांमध्ये गांगुलीने तब्बल 17 सिक्स मारले.   

2/10

ख्रिस गेल

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात सर्वाधिक सिक्स मारण्याच्या विक्रमात ख्रिस गेलचे दुसऱ्या स्थानावर आहे. या खेळाडूने 17 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये 15 सिक्स मारले.  

3/10

इऑन मॉर्गन

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा इऑन मॉर्गन सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कर्णधाराने 13 सामन्यांमध्ये 14 सिक्स मारले आहेत.  

4/10

शेन वॉटसन

शेन वॉटसन हा ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आहे. या खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 17 सामन्यात 14 सिक्स मारुन या विक्रमात तो चौथ्या स्थानावर आहे.  

5/10

पॉल कॉलिंगवूड

इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पॉल कॉलिंगवूडमध्ये 11 सामन्यांमध्ये 11 सिक्स ठोकले. सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पॉल कॉलिंगवूड पाचव्या स्थानावर आहे.  

6/10

हार्दिक पांड्या

भारतीय संघाचा स्टार हार्दिक पंड्या हा अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो. या क्रिकेटपटूने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 10 सिक्स मारले आहेत.  

7/10

शाहिद आफ्रिद

शाहिद आफ्रिद हा पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू आहे. शाहिद आफ्रिदने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात 10 सिक्स ठोकले आहेत.  

8/10

डॅविड मिलर

डॅविड मिलर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू असून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात 10 सिक्स ठोकले. या खेळाडूने सर्वाधिक सिक्सच्या विक्रमात सातवे स्थान मिळवले आहे.   

9/10

क्रेग मॅकमिलन

क्रेग मॅकमिलन हा न्यूझीलंडचा माजी फलंदाज आहे. क्रेगने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात 9 सिक्स मारले आहेत.  

10/10

जॅक कॅलीस

जॅक कॅलिस हा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आहे. या खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात 9 सिक्स मारले आहेत.