India vs Pakistan: पाकिस्तानी क्रिकेटपटूची पत्नी आहे 'या' भारतीय खेळाडूची मोठी चाहती

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या खेळाडूची मोठी फॅन पाकिस्तानी क्रिकेटरची पत्नी आहे. कोण आहे हा खेळाडू जाणून घेऊयात. 

तेजश्री गायकवाड | Feb 23, 2025, 12:05 PM IST

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या खेळाडूची मोठी फॅन पाकिस्तानी क्रिकेटरची पत्नी आहे. कोण आहे हा खेळाडू जाणून घेऊयात. 

1/7

ICC Champions Trophy 2025

ICC Champions Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या महान सामन्यादरम्यान उत्साह शिगेला असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा महान सामना आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर दुपारी 2.30 वाजता खेळवला जाईल. 

2/7

सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू

या काळात दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांच्या भावना प्रचंड उफाळून येतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या खेळाडूचे नाव विराट कोहली आहे. पाकिस्तानी क्रिकेटरची पत्नी टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीची मोठी फॅन आहे.

3/7

कोणत्या पाकिस्तानी क्रिकेटरची आहे पत्नी?

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची पत्नी शामिया आरजू ही भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची मोठी फॅन आहे. हसन अलीची पत्नी शामिया आरजूने एकदा इंस्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की विराट कोहली तिचा आवडता फलंदाज आहे असे सांगितले होते.   

4/7

हसन अलीची पत्नी आहे भारतातील

एका भारतीय मुलीच्या प्रेमात पडलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या यादीत हसन अलीचाही समावेश आहे. हसन अली हा भारताचे जावई आहेत. हसन अलीपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने 2010 मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न केले होते. मात्र, नंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचाही घटस्फोट झाला. याशिवाय आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर मोहसीन खानने बॉलीवूड अभिनेत्री रीना रॉयशी लग्न केले, जरी नंतर दोघांचा घटस्फोट झाला.  

5/7

शामिया आरजूचे कनेक्शन आहे हरियाणाशी

हसन अलीने 20 ऑगस्ट 2019 रोजी हरियाणातील नूह जिल्ह्यातील रहिवासी शामिया आरजूशी लग्न केले. हसन अली आणि भारतीय वैमानिक अभियंता शामिया आरजू यांचा विवाह दुबईमध्ये झाला, ज्यात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.

6/7

हसन अलीने शामियाला प्रपोज केले

हसन अलीच्या म्हणण्यानुसार, शामिया आरजूसोबत त्याची पहिली भेट एका डिनर दरम्यान झाली होती. काही वेळ भेटल्यानंतर हसन अलीने शामियाला प्रपोज केले.

7/7

हसन अलीचे करियर

३० वर्षीय पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अली सध्याच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानी संघाचा भाग नाही. हसन अलीने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 24 कसोटी, 66 एकदिवसीय आणि 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2017 मध्ये पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध हसन अलीने शानदार कामगिरी केली होती.