'लागिरं झालं जी' फेम अभिनेता 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शेअर केला भन्नाट व्हिडीओ

'लागिरं झालं जी'मधील भैय्यासाहेब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली आहे. 

| Dec 08, 2024, 12:17 PM IST
1/7

लागिरं झालं जी

'लागिरं झालं जी' फेम किरण गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार. अभिनेत्याने सोशल मीडियावर तारीख जाहीर करणारा व्हिडीओ शेअर केलाय.   

2/7

किरण गायकवाड

2024 मध्ये अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. 'लागिरं झालं जी' फेम किरण गायकवाड देखील लवकरच विवाहबंधनात  अडकणार आहे. 

3/7

फोटोशूट

'लागिरं झालं जी' आणि 'देवमाणूस' या मालिकेतून किरण गायकवाड हा घराघरात पोहोचला आहे. नुकतेच त्यांनी फोटोशूट केलं आहे. 

4/7

व्हिडीओ शेअर

किरण गायकवाड हा 'तू चाल पुढं' फेम अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्न करणार आहे. त्याने सोशल मीडियावर लग्नाची तारीख जाहीर करणारा व्हिडीओ शेअर केलाय.   

5/7

फोटोग्राफर

या व्हिडीओमध्ये फोटोग्राफर किरणला वैष्णवीजवळ येण्यास सांगत आहे. त्यानंतर तो दोघांना स्माईल देयाला सांगत आहे. 

6/7

भन्नाट व्हिडीओ

पुढे फोटोग्राफर किरणला वैष्णवीच्या खांद्यावर हात ठेवला सांगतो. हे झाल्यानंतर वैष्णवी त्याच्याकडे बघते आणि मारून निघून जाते. 

7/7

Save The Date

त्यानंतर लग्नाची तारीख जाहीर होते. ज्यामध्ये 'Save The Date 14 डिसेंबर. दोघे याच दिवशी विवाहबंधनात अडकणार आहेत.