हम दो हमारे दो! अभिनेता शंशाक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच छान

अभिनेता शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले असून त्याने आपल्या लेकीचं नाव देखील उघड केलं आहे. 

Soneshwar Patil | Jan 23, 2025, 18:18 PM IST
1/7

मराठी अभिनेता

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे अभिनेता शशांक केतकर. अभिनेत्याने मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. 

2/7

शंशाक केतकर

सोशल मीडियावर अभिनेता शंशाक केतकर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. 

3/7

आनंदाची बातमी

नुकताच अभिनेता शंशाक केतकर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय. शशांकने चिमुकल्या परीचे आगमन झाल्याची बातमी दिली आहे. 

4/7

व्हिडीओ शेअर

यासोबतच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातात पत्नीचा हात आणि दोघांच्या हातात लेकीचे हात दिसत आहेत. 

5/7

लक्ष्मीचं आगमन

दोघे पाळण्यात असलेल्या चिमुकलीकडे पाहताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ते घरी लक्ष्मीचं आगमन झाल्याचं म्हणत आहेत. तसेच व्हिडीओच्या शेवटी त्यांनी लेकीचे नाव सांगितले आहे. 

6/7

लेकीचे नाव

शशांक आणि प्रियंकाने त्यांच्या लेकीचे नाव 'राधा' ठेवलं आहे. अभिनेत्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह कलाकारांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 

7/7

लग्न

शशांक केतकरने 4 डिसेंबर 2017 मध्ये प्रियंका ढवळेसोबत लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव ऋग्वेद आहे.