विनोद कांबळीप्रमाणेच 'हे' सेलिब्रिटीही आज रसातळाला; राजेश खन्ना यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना एकेकाळी प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. पण आज ते रसातळाला पोहोचले आहेत.   

| Dec 09, 2024, 18:41 PM IST

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना एकेकाळी प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. पण आज ते रसातळाला पोहोचले आहेत. 

 

1/8

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. या व्हिडीओत विनोद कांबळी आपला मित्र सचिन तेंडुलकरशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. मात्र यावेळी तो थरथरत होता आणि साधं उभंही राहायला जमत नव्हतं. दारुचं व्यसन आणि शारिरीक समस्यांमुळे त्याची अवस्था न पाहण्यासारखी झाली आहे. कथितपणे त्याच्याकडे आता उपचारासाठीही पैसे नाहीत.   

2/8

सचिन आणि कांबळी यांनी त्यांच्या क्रिकेट करिअरची सुरुवात एकत्र केली होती. विनोद एकेकाळी खूप प्रसिद्ध क्रिकेटपटू होता, पण त्याच्या अनेक वाईट सवयींमुळे त्याची घसरण झाली. पण फक्त क्रीडा विश्वातच नाही तर बॉलिवूडमध्येही अशी अनेक उदाहरणं आहेत.   

3/8

विनोद कांबळीने 2000 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर तो चित्रपटसृष्टीकडे वळला. 2002 मध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी आणि प्रीती झांगियानी यांच्यासोबत 'अनर्थ' या चित्रपटात तो दिसला, जो फ्लॉप झाला. विनोदने 2009 मध्ये पुन्हा नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. 'पल पल दिल के साथ' या चित्रपटाचा तो झळकला. व्हीके कुमार दिग्दर्शित हा चित्रपटही फ्लॉप झाला.   

4/8

राजेश खन्ना हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. त्यांनी केलेला प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र, सर्व प्रयत्न करूनही राजेश खन्ना बॉलिवूडवर दीर्घकाळ राज्य करु शकले नाहीत. आपल्या अव्यावसायिक वृत्तीमुळे निर्माते त्यांच्यापासून दूर गेले आणि हळूहळू त्यांची कारकीर्द संपुष्टात आली.  

5/8

1990 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध सुपरस्टारपैकी एक असलेला गोविंदा बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. एकेकाळी या बहुप्रतिभावान स्टारला साईन करण्यासाठी निर्मात्यांची रांग असायची. मात्र, करिअरच्या शिखरावर आल्यानंतर अचानक गोविंदाची पडझड सुरू झाली. त्याने चित्रपटसृष्टीत होणारे बदल स्विकारले नाहीत आणि अंधश्रद्धेमुळा पायावर कुऱ्हाड मारली. आगामी काळात तो तीन नव्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.   

6/8

या यादीत विशाल मल्होत्राच्या नावाचाही समावेश आहे. त्याने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला होता की, एकेकाळी स्टारडम डोक्यात गेले आणि त्यामुळे त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले. विशालने कबूल केले की, त्याने स्वतःचे करिअर संपवले. अभिनेत्याने सांगितले की, त्याच्या अहंकारामुळे त्याला काम मिळणे बंद झाले.  

7/8

अमिषा पटेल तिच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, ती बराच काळ पडद्यावरून गायब राहिली. मोठ्या ब्रेकनंतर ती 'गदर 2' चित्रपटात दिसली. पण, अमिषा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यातील वाद कोणापासून लपून राहिलेला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, अभिनेत्री फी आणि भूमिकांशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल दिग्दर्शकावर आरोप करताना दिसली.  

8/8

भाग्यश्री 1989 साली मोठ्या पडद्यावर दिसली. सूरज बडजात्या दिग्दर्शित 'मैने प्यार किया' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात भाग्यश्रीसोबत सलमान खान होता. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. रिपोर्ट्सनुसार भाग्यश्रीने सलमान खानपेक्षा तिप्पट फी घेतली होती. मात्र, त्यानंतर ती पडद्यावरून गायब झली. काही वर्षांच्या ब्रेकनंतर तो 'राधे श्याम' या मेगा बजेट चित्रपटातून पुनरागमन करताना दिसला.