थंडीच्या दिवसांमध्ये 'हे' फळ खाल्ल्याने शरीराला मिळतात जबरदस्त फायदे

थंड हवामानात काही फळांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यांमुळे आरोग्य निरोगी राहते. हिवाळ्यात चिकू हे फळ खाल्ल्याने अनेक फायदे होतात.  

| Dec 09, 2024, 16:59 PM IST

थंडीच्या दिवसांमध्ये 'हे' फळ खाल्ल्याने शरीराला मिळतात जबरदस्त फायदे | health benefits of eating chikoo in winter 

1/7

महत्त्वाचे पोषक घटक:

चिकूमध्ये मॅग्नेशियम, मॅगनीज, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय, चिकूमध्ये व्हिटॅमिन बी, सी, ई आणि कॅल्शियमही असते जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.    

2/7

हाडांसाठी फायदेशीर:

चिकूमध्ये लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे हिवाळ्यात हाडांच्या आरोग्यासाठी चिकू खाणे उपयुक्त ठरते.  

3/7

पचनासाठी उपयुक्त:

चिकूमधील फायबर आणि इतर पोषक घटक पचनक्रिया सुधारण्यात मदत करतात. त्यामुळे अन्न पचण्यास अधिक सुलभ होते आणि पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते.  

4/7

रक्तदाब नियंत्रणात ठेवते:

चिकूमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी हे फळ लाभदायक ठरते.  

5/7

त्वचेसाठी फायदेशीर:

चिकूमध्ये असलेले एस्कॉर्बिक अ‍ॅसिड, फ्लेवोनोइड्स, आणि पॉलीफेनोल्स सारखे अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर असतात. याशिवाय, व्हिटॅमिन सीमुळे त्वचेला तजेलदारपणा येतो आणि ती निरोगी राहते.    

6/7

रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त:

चिकूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि कॉपर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात सर्दी आणि इतर लहानसहान आजारांपासून बचाव होतो. 

7/7

चिकू केवळ चविष्टचं नाही, तर हिवाळ्यात शरीराला गरजेचे पोषक तत्वही पुरवते. यामुळे थंडीत हे फळ आहारात आवर्जून समाविष्ट करा. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)