प्रियकराच्या प्रपोजलला काय असेल अंकिताचं उत्तर?
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अंकिता तथाकथित बॉयफ्रेंड विकी जैनसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपबाबत आणि लग्नाबाबत चर्चा आहेत.
1/5

2/5

3/5

रिलेशनशिपच्या नात्याला अंकिताने आता दुजोरा दिला असला तरीही, यापूर्वीसुद्धा तिने प्रेमाच्या नात्यात असल्याचं कधीच नाकारलं नव्हतं. एका मुलाखतीत तिने नाव न घेता विकीसोबतच्या नात्याविषयी वक्तव्य केलं होतं. 'तो अतिशय चांगला आहे. तो बिलासपूरमध्ये व्यावसायिक आहे. हो मी प्रेमात आहे पण, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हाच तुम्हाला याबाबत माहिती मिळेल' असं ती म्हणाली होती.
4/5
