M S Dhoni चं नाव घेतलं तरी संतापते 'ही' अभिनेत्री! म्हणते, "तो माझ्या आयुष्यातील काळा डाग"

This Actress Hates MS Dhoni: या अभिनेत्रीने मध्यंतरी धोनीबरोबरच्या नात्यांबद्दल भाष्य केलं होतं. धोनीच्या लग्नानंतर 4 वर्षांनी या अभिनेत्रीने गौप्यस्फोट केल्यानंतरही धोनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र या अभिनेत्रीने आता धोनीच्या नावाने आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते अशा स्वरुपाची प्रतिक्रिया नोंदवली आहे. जाणून घेऊयात हे नेमकं काय प्रकरण आहे...

| May 15, 2023, 17:18 PM IST
1/12

Actress Hates Dhoni

इंडियन प्रमिअर लिगमध्ये खेळत असलेला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या चर्चेत आहे तो त्याच्या कथित रिटायरमेंटमुळे.

2/12

Actress Hates Dhoni

धोनीने यंदाचं पर्व शेवटचं असल्याचं वगैरे काहीही जाहीर केलेलं नसलं तरी यापुढे धोनी आयपीएलही खेळणार नाही असं मानलं जात आहे.

3/12

Actress Hates Dhoni

सध्या केवळ आयपीएलमुळे चर्चेत असणारा धोनी तसा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. धोनीने 2010 साली साक्षीबरोबर लग्न केलं. 

4/12

Actress Hates Dhoni

सध्या धोनी आणि साक्षीचा सुखाचा संसार सुरु असून त्यांना झिवा नावाची गोंडस मुलगीही आहे.

5/12

Actress Hates Dhoni

मात्र लग्नबंधनात अडकण्याआधी धोनी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट करत होता. लक्ष्मी राय असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

6/12

Actress Hates Dhoni

धोनीने कधीही लक्ष्मी रायबरोबर नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं नाही. मात्र लक्ष्मीने धोनीला प्रियकर म्हणून स्वीकारलं होतं.

7/12

Actress Hates Dhoni

लक्ष्मी राय आणि धोनीच्या कथित अफेअरची पेज थ्रीवरही चांगलीच चर्चा होती. अनेकदा मीडियाकडून लक्ष्मीला धोनीबद्दल प्रश्न विचारले जायचे.

8/12

Actress Hates Dhoni

लक्ष्मी रायने 2014 साली आपण धोनीला डेट करत होतो असं एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र लक्ष्मीच्या या प्रतिक्रियेनंतर धोनीकडून किंवा त्याच्या निकटवर्तीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. 

9/12

Actress Hates Dhoni

2009 मध्ये आम्ही एकमेकांना डेट करत होतो असं सांगणाऱ्या लक्ष्मीला आता धोनीसंदर्भातील प्रश्न विचारलेलं अजिबात आवडत नाही. तिने तसं बोलूनही दाखवलं आहे.

10/12

Actress Hates Dhoni

धोनीबरोबरच अल्पावधीसाठी निर्माण झालेलं नातं हे आपल्या आयुष्यातील काळा ठपका असल्याचंही लक्ष्मी रायने एकदा म्हटलं होतं.

11/12

Actress Hates Dhoni

"मला वाटतं की धोनीबरोबरचं माझं नातं माझ्या आयुष्याला लागलेल्या एखाद्या काळ्या डागासारखं आहे. हा डाग बराच काळ पुसला जाणार नाही," असं लक्ष्मीने म्हटलं होतं.  

12/12

Actress Hates Dhoni

"जेव्हा धोनीच्या भूतकाळाबद्दल बोललं जातं मला त्यात खेचलं जातं. मला हे आवडत नाही," असं लक्ष्मी रायने म्हटलं होतं.