फँड्रीमधील जब्या आणि शालू अडकले विवाहबंधनात? हळदी आणि लग्नाचा फोटो व्हायरल

 फँड्री चित्रपटातील शालू आणि जब्या अडकले विवाहबंधानात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण. काय आहे सत्य? वाचा सविस्तर

Soneshwar Patil | Nov 02, 2024, 17:24 PM IST
1/7

जब्या आणि शालू विवाहबंधनात अडकले?

नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातील शालू (राजेश्वरी खरात) आणि जब्या (सोमनाथ अवघडे) यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

2/7

फोटो शेअर

दोघेही फोटोमध्ये वधू-वराच्या वेषात दिसत आहे. राजेश्वरी खरातने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. 

3/7

हळदीचा फोटो

त्यासोबतच सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात यांचा हळदीचा देखील फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राजेश्वरीने पिवळ्या रंगाची साडी तर सोमनाथने पांढरा कुर्ता परिधान केला आहे.   

4/7

एकत्र काम

दोघांनीही फँड्री चित्रपटात एकत्र काम केलं आहे. याच चित्रपटातून दोघांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. सोशल मीडियावर दोघांचे लाखो चाहते आहेत. 

5/7

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा फोटो व्हायरल होताच चाहते देखील संभ्रमात पडले आहेत. त्यांनी देखील फोटोंवर कमेंट्स करून प्रश्न उपस्थित केला आहे. 

6/7

कमेंट्सचा वर्षाव

राजेश्वरी खरातने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्यामध्ये काही चाहत्यांनी हे फोटोशूट चित्रपटाच्या शूटिंगचे असावे असे म्हटले आहे. 

7/7

शूटिंगमध्ये व्यस्त

काही दिवसांपूर्वी देखील सोमनाथने राजेश्वरीसोबत एक फोटो शेअर केला होता. जब्या आणि शालू दोघे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं म्हटलं जात आहे.