ZEE Chitra Gaurav Puraskar Paani : झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात पाणी ठरला अव्वल!

ZEE Chitra Gaurav Puraskar : आदिनाथ कोठारेच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शन असलेल्या 'पाणी'ने पटकावले 7 पुरस्कार! या चित्रपटासाठी आदिनाथनं अनेक वर्ष या विषयाचा अभ्यास केला. या चित्रपटासाठी त्याला बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची साथ मिळाली. 

Diksha Patil | Feb 20, 2025, 12:32 PM IST
1/7

पहिलं दिग्दर्शन आणि तब्बल 7 पुरस्कार आदिनाथ कोठारेच्या 'पाणी' ची झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात खास मोहर! 

2/7

अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट 'पाणी' ने झी चित्र गौरव पुरस्कारात तब्बल 7 पुरस्कार जिंकले असून पाणी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. 

3/7

मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या आयुष्यावर प्रेरित होऊन सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अव्वल ठरला आहे. 

4/7

 'पाणी'ची गोष्ट ही खास ठरली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली. 'पाणी'मध्ये आदिनाथनं दुहेरी भूमिका साकारून उत्तम काम केलं.त्यासोबत अनेक फिल्म फेस्टीवलमध्ये 'पाणी' ला विशेष कौतुक मिळवलं. 

5/7

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात पाणी ने सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन ( अनमोल भावे ) सर्वोत्कृष्ट पटकथा (नितीन दीक्षित) सर्वोत्कृष्ट गीत (पाणी टायटल ट्रॅक आणि नाचनारा) आदिनाथ कोठारे आणि मनोज यादव सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गुलराज सिंग) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( आदिनाथ कोठारे) सर्वोत्कृष्ट चित्रपट ( पाणी ) असे तब्बल 7 पुरस्कार पटकावले आहेत.

6/7

मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आदिनाथ कायम प्रयोगशील भूमिका आणि तितकच खास दिग्दर्शन करताना दिसतो येणाऱ्या काळात आदिनाथ अजून एका नव्या चित्रपटाच दिग्दर्शन करणार असून वेगवेगळ्या भूमिका साकारणार असल्याचं कळतंय!

7/7

(Photo Credit : PR Handover)