'दर्जा घसरत चालला आहे,' इब्राहिम आणि खुशीच्या प्रमोशन व्हिडीओवर नेटकरी संतापले

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांनी त्यांचा नेटफ्लिक्स चित्रपट 'नादानिया'च्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. पण या दोघांच्या प्रमोशन व्हिडीओवर नेटकरी संतापले आहेत.

Intern | Feb 20, 2025, 15:54 PM IST
1/8

सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खान नेटफ्लिक्सवरील 'नादानिया' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या रोमँटिक ड्रामामध्ये खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे.  

2/8

मंगळवारी, या दोन्ही कलाकारांनी चित्रपटाचा एक प्रमोशनल व्हिडीओ शेअर केला, ज्यामुळे टीझर आणि रिलीज डेटच्या घोषणेची चर्चा वाढली. या व्हिडीओमध्ये त्यांच्या जाणूनबुजून केलेल्या चुकीच्या अभिनयामुळे सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाल्या आहेत.   

3/8

व्हिडीओमध्ये, इब्राहिम तिला भेटण्यासाठी विचारताना दिसत आहे, परंतु शूटिंग संपले असल्याने ती त्याला टाळते. यामुळे इब्राहिमला अश्रू अनावर होतात. या व्हिडीओवर खुशीने कॅप्शन दिले, 'Clearly his #Galatfehmi.'  

4/8

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि रेडिटवरही शेअर करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी 'क्रिंज' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, 'त्यांचे प्रेक्षक कोण आहेत? तरुण वर्ग या क्रिंज जाहिराती पाहून या गोष्टीला पूर्णपणे नकार देतील! ज्या टिकटॉक वापरकर्त्यांनी अशा प्रकारचे व्हिडीओ तयार केले होते, ते आता हा चित्रपट पाहतील का? मला नाही वाटत.'  

5/8

दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, 'ही वाईटाची आणखी एक पातळी आहे. तसेच इब्राहिमची अभिनय क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.' 

6/8

स्टार किड्स आणि त्यांच्यातील प्रतिभेच्या कमतरतेवर टीका करत एका कमेंटमध्ये लिहिले, 'नेपो किड्सचा दर्जा दररोज कमी होत चालला आहे.'

7/8

नेटफ्लिक्सच्या एका प्रेस रिलीजमध्ये 'नादानिया' हा एक रोमँटिक ड्रामा असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटात 'पहिल्यांदा प्रेमात पडण्याचा उत्साह दाखवण्यात आला आहे . हा चित्रपट तरुण पिढीसाठी आहे जो पहिल्या प्रेमाची जादू, वेडेपणा आणि निरागसता दर्शवते. दक्षिण दिल्लीतील पिया, एक धाडसी आणि उत्साही मुलगी तसेचं नोएडाचा एक दृढनिश्चयी मध्यमवर्गीय मुलगा अर्जुन हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.'

8/8

'नादानिया'मध्ये महिमा चौधरी, सुनील शेट्टी, दिया मिर्झा आणि जुगल हंसराज यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी धर्मा प्रोडक्शन्स बॅनरखाली केली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात करण जोहरच्या सहाय्यक दिग्दर्शक असलेल्या शौना गौतमचेही पदार्पण या चित्रपटातून होणार आहे.