अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची एकूण संपत्ती वाचून थक्क व्हाल

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. नुकतंच शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्यावर गुंणतणूकदारांची फसवणूकीचा आरोप करण्यात आला. 

Jun 15, 2024, 12:04 PM IST

गोल्ड स्कीम प्रकरणात मुंबईतल्या सराफाची फसवणूक केल्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी अडचणीत सापडले आहेत. 

1/7

काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या मालमत्तेवर ईडीने धाड टाकली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 7 कोटी रुपयांच्या बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्यात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचं नाव समोर आलं होतं. 

2/7

या सगळ्या प्रकणात ईडीने राज कुंद्राची 98 कोटींची मालमत्ता, पुण्यातील बंगला आणि जूहूचा अलिशान फ्लॅट जप्त केला होता.

3/7

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपामुळे शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा कायमच चर्चेत आला आहे.  2017 मध्ये राज कुंद्राने 6600 कोटी रुपये बिटकॉईन्सच्या स्वरुपात घेतले. दर महिना 10 टक्के याचा परतावा दिला जाईल असं गुंतवणूकदारांना त्याने खोटं आश्वासन दिलं होतं.   

4/7

राज कुंद्राची एकूण संपत्ती

राज कुंद्रा हा उद्योगपती असून त्याच्या अनेक कंपन्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्राची एकूण संपत्ती 2,800 कोटी असून आशियातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहे. 

5/7

त्याचं स्वत:चं खाजगी विमान देखील आहे. शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत खाजगी विमानाने प्रवास करतानाचे फोटो सोशलमीडियावर व्हायरल देखील झाले. 

6/7

ग्रुपको डेव्हलपर्स, टीएमटी ग्लोबल, विवान इंडस्ट्रीज, जेएल स्ट्रीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्याचा तो मालक आहे.  

7/7

युके मधील बंगला

लग्नाआधी शिल्पाला राज कुंद्राने युकेमध्ये अलीशान बंगला गिफ्ट केला. लंडनमधील सर्वात महागड्या परिसरात राज आणि शिल्पाच्या मालकीचा बंगला आहे. हा बंगला त्याने शिल्पाला लग्नाचं गिफ्ट म्हणून दिला होता.