डायमंड प्लॅनेट! या ग्रहावर पडतो चमचमत्या हिऱ्यांचा पाऊस; हिरे पृथ्वीवर आणू शकतो का?

अवकाशात असलेल्या या ग्रहावर हिऱ्यांचा पाऊस पडतो.  

Sep 05, 2023, 23:56 PM IST

Diamond Planet : काही दिवसांपूर्वी अवकाशात सोन्याचा ग्रह सापडला होता. यानंतर आता अंतराळात डायमंड प्लॅनेट आढळला आहे.  या ग्रहावर चमचमत्या हिऱ्यांचा पाऊस  पडतो. जाणून घेऊया कोणता आहे हा ग्रह.

1/8

 मोठ्या प्रमाणात सोने आणि इतर धातू असलेला 16Psyche Gold Planet हा ग्रह सापडला होता. यानंतर आता Planet of Diamonds हा ग्रह सापडला आहे.   

2/8

पृथ्वीपासूनहा ग्रह  40 प्रकाशवर्षे आहे. यामुळे या ग्रहावरुन पृथ्वीवर हिरे आणणे अशक्य आहे. 

3/8

कार्बन अतिशय उच्च तापमानात असल्यामुळे ग्रह कार्बन असलेल्या तार्‍यांभोवती फिरत असताना येथील ग्रेफाइटचे हिऱ्यांमध्ये रुपांतर होत आहे. यामुळे येथील ग्रेफाइटचा हिऱ्यांच्या रुपात वर्षाव होते. 

4/8

या ग्रहावर मोठ्या प्रमाणात कार्बन आहे. या उच्च तापमानामुळेच या ग्रहाचा पृष्ठभाग पूर्णपणे हिरा बनला आहे.   

5/8

या ग्रहाचं तापमान 2000 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. या ग्रहीवर एक वर्ष हे अवघ्या 18 तासांचे आहे. 

6/8

हा ग्रह सूर्याला नाही तर, त्या ताऱ्यांना प्रदक्षिणा घालतो ज्यांच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असते. 

7/8

2004 साली रेडियल वेलोसिटी (Radial Velocity) च्या मदतीने या ग्रहाचा शोध लावला आहे. जगभरातील देश या ग्रहाबाबत अधिक संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत.   

8/8

55Cancri E असे या ग्रहाचे नाव आहे. या ग्रहाला Exo-Planet असंही म्हटलं जातं.