किंग कोहली द ग्रेट! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव, क्रिकेटचा देवही पडला मागे

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. रविवारी झालेल्या या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार फलंदाजी करून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. यासोबत त्याने क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याच्या कामगिरीला देखील मागे टाकले. 

Pooja Pawar | Feb 23, 2025, 21:06 PM IST
1/7

दुबईत खेळवण्यात आलेल्या भारत - पाकिस्तान सामन्यात खेळताना विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये 15 धावा पूर्ण करताच वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. विराट वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान 14000 धावा पूर्ण करणारा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. 

2/7

विराट कोहली 14000 धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला असून यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा यांनी वनडेत 14000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता. 

3/7

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने 359 वनडे सामन्यात 350 इनिंग खेळताना 14000 धावांचा टप्पा गाठला होता तर कोहलीने ही उपलब्धी 298 सामन्यात 287 इनिंग खेळताना पूर्ण केली.

4/7

श्रीलंकेचा माजी फलंदाज आणि विकेटकिपर कुमार संगकारा याने 378 इनिंगमध्ये 14000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता. मात्र यादोघांमध्ये विराट कोहलीने सर्वात कमी इनिंगमध्ये 14000 धावा पूर्ण केल्या आहेत. यात विराटच्या 50 शतक आणि 74 अर्धशतकांचा सुद्धा समावेश आहे. 

5/7

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा, 9000 धावा, 10,000 धावा, 11,000 धावा, 12,000 धावा, 13,000 धावा आणि सर्वात जलद 14,000 धावा केल्या आहेत.

6/7

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.  विराटच्या आधी या यादीत सचिन तेंडुलकर 18426 धावांसह पहिल्या स्थानावर आहे तर संगकारा 14234 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

7/7

भारत - पाक सामन्यादरम्यान विराट कोहलीने वेगवान गोलंदाज हरिस रौफच्या बॉलवर चौकार मारून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14000 धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याने भारतीय इनिंगमधील १३व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर रौफला शानदार चौकार लगावला आणि विश्वविक्रम रचला.