Donald Trump यांना अटक? पोलिसांकडून धक्काबुकी, गोंधळ आणि राड्याचे Photos चर्चेत

Donald Trump Being Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मागील काही दिवसांपासून एका अडल्ट फिल्मस्टारने केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे पुन्हा समोर आलेलं प्रकरण गाजत आहे. असं असतानाच या प्रकरणात ट्रम्प यांच्या महाभियोग खटला दाखल करुन त्यांना अटक होण्याची चर्चाही चांगली रंगली असताना काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. याच फोटोंबद्दल जाणून घेऊयात...

Mar 23, 2023, 17:11 PM IST
1/15

Trump Arrested

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पोलिसांनी अटक केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील ड्रामा आणि गोंधळ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. (सर्व फोटो - Twitter/EliotHiggins वरुन साभार)

2/15

Trump Arrested

पोलिसांनी ट्रम्प यांना अगदी उचलून नेल्याचं दाखवणारा हा फोटो

3/15

Trump Arrested

ट्रम्प यांना अटक करताना बराच राडा झाल्याचा हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

4/15

Trump Arrested

खरं सांगायचं झालं तर ट्रम्प यांना प्रत्यक्षात अटक झालेली नाही. हे सर्व फोटो आर्टिफिशिएल इंजेलिजेन्सच्या मदतीने एलिओट हिगिन्स (Eliot Higgins) या इलेस्टेटरने तयार केले आहेत.

5/15

Trump Arrested

ट्रम्प आणि पोलिसांमध्ये अटकेआधी बाचाबाची होईल असं या व्यक्तीने इमॅजिन केलं आहे. हे फोटो इतक्या उत्तमरित्या तयार करण्यात आले आहेत की ते क्षणभर खरेच वाटतात. संपूर्ण घटनाक्रम या फोटोंच्या माध्यमातून चित्रित करण्यात आलाय. पाहूयात असेच काही फोटो आणि प्रसंग...

6/15

Trump Arrested

नंतर ट्रम्प पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करतील असंही या फोटोंमध्ये दाखवण्यात आलं आहे.

7/15

Trump Arrested

पोलिस ट्रम्प यांचा पाठलाग करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

8/15

Trump Arrested

ट्रम्प यांचा पोलिसांबरोबर बराच वाद होईल अशी शक्यता व्यक्त करणारा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे.

9/15

Trump Arrested

ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांचेही फोटो या आर्टिस्टने तयार केले आहेत. यामध्ये त्याने ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया यांचा प्रतिसाद कसा असेल याची कल्पना केली आहे.

10/15

Trump Arrested

ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया या आक्रोश करत पोलिसांना विरोध करतील अशी शक्यता या कलाकाराने व्यक्त केली आहे.

11/15

Trump Arrested

तुरुंगात जावं लागलं तर ट्रम्प अशाच प्रकारे बसलेले असतील अशी कल्पनाही या कलाकाराने केली आहे.

12/15

Trump Arrested

ट्रम्प यांना तुरुंगामध्ये घेऊन येणारे पोलीस अधिकारीही या कलाकाराने अशाप्रकारे रेखाटलेत.

13/15

Trump Arrested

तुरुंगात डांबल्यानंतर ट्रम्प कसे रिअॅक्ट करतील याची कल्पनाही या आर्टीस्टने केली आहे.

14/15

Trump Arrested

ट्रम्प यांना तुरुंगात घेऊन जातानाचा हा पाठमोरा फोटोही या इलेस्टेटरने पोस्ट केला आहे.

15/15

Trump Arrested

अमेरिकेमध्ये कैद्यांना दिले जातात तसे भगव्या रंगाचे कपडे ट्रम्प यांना दिल्याचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे.