चहा प्यायल्याने उंची खुंटते का? काय म्हणाले Expert

Tea : चहामुळे उंचीवर परिणाम होतो असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे अनेक पालकांची चिंता वाढली आहे. मात्र याबाबत Expert नेमकं काय सांगतात जाणून घेऊया...

Mar 23, 2023, 17:05 PM IST

Tea : आपल्या मुलाची उंची वाढावी हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. मुलांची उंची वाढावी यासाठी त्यांचे पालक त्यांना सर्व प्रकारचे पदार्थ खाऊ घालतात. मात्र मुलांच्या उंचीबाबत असंही म्हटलं जातं की चहा प्यायल्याने त्यांची उंची थांबते. बरेच लोक असेही म्हणतात की जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्याने मुलांची उंची देखील थांबते. पण प्रश्न असा आहे की चहा पिल्याने खरंच उंची वाढायची थांबते का?

1/5

drinking tea

सोशल मीडियावर सध्या चहा प्यायल्यामुळे उंची खुंटते असा मेसेज व्हायरल होतोय. याबाबत आता बालरोग तज्ञ मंदार देशपांडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.  

2/5

tea height

चहा प्यायल्याने उंची खुंटते हे असत्य विधान आहे. चहामध्ये टॅनिंग कॅफिन नावाचे घटक असतात. त्यामुळे शरिरातील लोहाचे प्रमाण कमी होते.

3/5

tea anemia

टॅनिंग हे शाकाहारी मुलांमध्ये लोह तयार करण्यात अडथळे आणतं. शरिरात लोह कमी असलेल्या अॅनिमियामुळे रक्ताची वाढ होत नाही. त्यामुळे मुलांचे वजन वाढते. पण उंची वाढण्याशी याचा काही संबंध नाही.

4/5

tea acidity

चहामध्ये असलेल्या इतर घटकांमुळे अॅसिडीटी वाढते. त्यामुळे पचनविकाराचा त्रास होऊ शकतो. कॅफिनमुळे काही मुलांच्या हृदयाची गती वाढते. अति चहाच्या सेवनामुळे झोप लागत नाही.

5/5

tea research

मात्र हे वैद्यकीय दृष्ट्या सत्य वाटत नाही. याचा अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे, असेही बालरोग तज्ञ मंदार देशपांडे यांनी म्हटले आहे.