संभाजीनगरमध्ये अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाताय, सावधान! पर्यटकांना इशारा

छत्रपती संभाजनगरात (Chatrapati Sambhajinagar) एकूण चार लेणी आहेत. या सिल्लोड तालुक्यात अजिंठा लेणी (Ajintha Caves), खुलताबाद तालुक्यात वेरुळ लेणी ( Verul Caves), औरंगाबाद तालुक्यात औरंगबाद लेणी आणि कन्नड तालुक्यात पितळखोरा लेणी आहे. यापैकी अजिंठा आणि वेरूळच्या लेणींचा जागतिक वारसास्थळात ( World Heritage Site) समावेश आहे, या लेणी जगप्रसिद्ध आहेत. देशासह परदेशातील हजारो पर्यटक (Tourist) या लेणी पाहण्यासाठी येत असतात. पण इथे येणाऱ्या पर्यटाकांसाठी पुरातत्व विभागाने काही सूचना केल्या आहेत.

| May 01, 2023, 22:11 PM IST
1/6

महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्माण झाली असल्याचं बोललं जातं. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. हजारो पर्यटक या ठिकाणी लेणी पाहण्यासाठी येतात.

2/6

पण छत्रपती संभाजी नगरच्या अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाताय तर  सावधान. लेण्यांमध्ये  उग्र वासाचे परफ्यूम वापरू नका. लाल रंगाचे कपडे घालू नका. कारण त्यामुळे लेणींच्या परिसरातील मधमाशा तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे, असं सर्वेक्षण पुरातत्व विभागाने केलं आहे. 

3/6

मिथिलिन क्लोराइड, फेरॉन यांचा वापर केलेले उग्र गंधाचे परफ्यूम आणि लाल रंगामुळे मधमाशा चिडतात. त्यामुळे उग्र वासाचे परफ्यूम वापरून किंवा लाल रंगाचे कपडे घालून लेणीच्या किमान एक किलोमीटर परिसरात येणे टाळावे, असे तज्ज्ञांचं मत आहे. 

4/6

मधमाशांच्या मोहळापासून सावध राहावं असं आवाहन भारतीय पुरातत्त्व विभागाने पर्यटकांना केलं आहे. त्याचबरोबर यासंदर्भात विभागाने कर्मचाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत

5/6

काही दिवसांपूर्वी अजिंठा लेणीत मधमाशांनी 20 पर्यटक आणि 6 कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. वेरूळ इथं 16 क्रमांकाची कैलास लेणी पाहताना 9 एप्रिल रोजी 16  पर्यटकांवर आग्यामोहोळाच्या माशांनी हल्ला चढवला होता त्यात 16 पर्यटक जखमी झाले होते. 

6/6

दहा वर्षांपूर्वी लेणी क्रमांक 29 आणि 16  मध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात विदेशी पर्यटक गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी 2007 मध्येही आग्यामोहोळाने पर्यटकांवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली होती. या घटनांचा पुरातत्व विभागाने अभ्यास केला आणि त्यानंतर मार्गदर्शक  सूचना जाहीर केल्या आहेत.