चेक्सचा शर्ट अन् गॉगल; अजित पवारांचा मेट्रोमधील रेट्रो लूक चर्चेत

अजित पवार यांनी नागपूर मेट्रोतून सैर केली आहे. 

Dec 16, 2023, 20:29 PM IST

Ajit Pawar Travelling in Nagpur Metro: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर मेट्रोने प्रवास केला आहे. यावेळी अजित पवारांच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी अजित पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला.

1/7

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुणे मेट्रोने प्रवास केला. 

2/7

राज्याचे हिवाळी अधिवनेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अजित पवार हे सध्या नागपूरमध्येच आहेत.   

3/7

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीताबर्डी ते खापरी असा नागपूर मेट्रोतून प्रवास केला. 

4/7

नागपूर मेट्रोतून प्रवास करताना अजित पवार यांनी नागपूरमधील विकास प्रकल्पांचा आढावा देखील घेतला.

5/7

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यावेळी  प्रशासकीय अधिकारी, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

6/7

प्रवासादरम्यान अजित पवार यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला. 

7/7

अजित पवारांचा डॅशिंग लूक चांगलाच चर्चेत आला आहे. डोळ्यावर गॉगल आणि चेक्सचा शर्ट असा अजित पवार यांचा लुक होता.