दारू पिणे थांबवलं की यकृतावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Alcohol's health effects : दारु सर्वात पहिल्यांदा पोहोचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण दारुचे 90 टक्के विघटन यकृतामध्ये होते. म्हणून, तुम्ही जितके जास्त दारु पिता तितके तुमचे यकृत अधिक गंभीर होते. परिणामी, यकृत निकामी वेगाने होते. दारुमुळे तुमच्या यकृताचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे त्याचा तात्काळ दुष्परिणाम म्हणजे यकृतावर दिसून येतो. 

Mar 05, 2024, 15:47 PM IST
1/8

मानवी शरीरातील यकृत महत्त्वाचा भाग असतो. शरीरात अल्कोहोल आणि विषारी द्रव्ये नष्ट करण्यासाठी पित्त तयार करण्याचे काम आणि ग्लुकोज साठवण्यासाठी यकृत कार्य करित असते. पण अनेक गोष्टींमुळे यकृत खराब होऊ लागले आहे. यकृत खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे दारूचे अतिसेवन करणे होय. 

2/8

यकृताच्या आजाराची काही लक्षणे - यकृतावर सूज, थकवा, वजन कमी होणे, भूक न लागणे, मळमळ किंवा उलट्या, पोटाच्या वरच्या उजव्या भागात समस्या उद्भवू शकतात.

3/8

यकृताच्या आरोग्याला चालना देण्यासाठी, तुम्ही ताज्या गोष्टी, संपूर्ण धान्य, प्रथिने, तसेच उच्च साखर, अस्वास्थ्यकर चरबी आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट मर्यादित प्रमाणात वापरणे महत्वाचे आहे.

4/8

लठ्ठपणामुळे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोका लक्षणीय वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे वजन राखणे महत्त्वाचे आहे.

5/8

नियमित आरोग्य तपासणी करून तुम्ही कोणताही आजार वेळेपूर्वी शोधू शकता. जर तुम्हाला अल्कोहोलशी संबंधित यकृत रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसली तर नक्कीच डॉक्टरांना दाखवा.

6/8

निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. नियमितपणे आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. अल्कोहोल, धूम्रपान आणि अमली पदार्थांचं व्यसन टाळा.

7/8

असुरक्षित सेक्स किंवा एकाहून अधिक पार्टनरसोबत लैंगिक संबंध हॅपेटायटीस बी आणि हॅपेटायटीस सीचा धोका वाढवतं.  

8/8

हॅपॅटायटीस ए आणि हॅपेटायटीस बीसाठी विशेष लसी आहेत. हॅपेटायटीस सी विषाणूविरूद्ध कोणतीही लस नाही. जर कोणी हॅपेटायटीस बी किंवा सीसाठी सकारात्मक असेल तर, त्यांनी वैद्यकीय देखरेखीखाली नियमितपणे अँटीवायरल औषधं घ्यावी. तसंच नियमित रक्त तपासणी आणि यकृताचे अल्ट्रासाऊंड नियमित करणं गरजेचं आहे.