मोदी सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांंना मंत्रीपद, तर वरिष्ठांना बढतीची शक्यता
shailesh musale
| May 24, 2019, 15:56 PM IST
1/10

भाजपला मिळालेल्या प्रंचड मोठ्या विजयानंतर आता मोदी सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत देशात चर्चा सुरु झाली आहे. पुढच्या आ़ठवड्यात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आणखी कोणाकोणाला स्थान मिळतं हे पाहणं देखील उत्सूकतेचं ठरणार आहे. गांधीनगर मतदारसंघातून विजयी झालेले भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या नावाची यामध्ये जोरदार चर्चा आहे. अमित शहा यांना महत्त्वाचा विभाग मिळू शकतो. सोबत अनेक मंत्र्यांना त्यांनी केलेल्या कामासाठी मंत्रीपद मिळू शकतं.
2/10

3/10

4/10

5/10

6/10
अरुण जेटलींच्या प्रकृतीबाबत चिंता

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता आहे. त्यांना गुरुवारी दिल्लीच्या एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. ते भाजपच्या मुख्यालयात झालेल्या विजय उत्सवात देखील सहभागी होऊ शकले नव्हते. पुढच्या महिन्यात येणाऱ्या आर्थिक आव्हानांना पाहता पक्षात याला तोंड कसे द्यावे याबाबत चिंता आहे. त्यामुळे अर्थमंत्री कोणाला करायचे याबाबत देखील चिंता आहे. जेटली हे जवळपास ३ आठवड्यांपासून आराम करत आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी अर्थखातं योग्य प्रकारे सांभाळलं. यावर्षी २२ जानेवारीला त्यांच्यावर अमेरिकेत महत्त्वाची सर्जरी झाली होती. त्यामुळे त्यांना बजेट देखील सादर करता आलं नव्हतं. पियुष गोयल यांना ती जबाबदारी देण्यात आली होती.
7/10

8/10

9/10
