माझी जोधा होशील का? ऐश्वर्या रायला कशी मिळाली 'जोधा अकबर' सिनेमात भूमिका?

आशुतोष गोवारिकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘जोधा अकबर’ (2008) हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटात ऋतिक रोशनने बादशाह अकबरची भूमिका साकारली होती, तर ऐश्वर्या राय जोधा बाईच्या भूमिकेत दिसली होती. 

Feb 16, 2025, 18:06 PM IST
1/7

 दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.  पण तुम्हाला माहित आहे का? हा चित्रपट ऐश्वर्याला कासा मिळाला.

2/7

चित्रपटाचा प्रभाव आणि गाणी

‘जोधा अकबर’ प्रदर्शित होताच खूप गाजला. ऋतिक आणि ऐश्वर्याची केमिस्ट्री, भव्य सेट, आकर्षक वेशभूषा आणि दमदार संगीत यामुळे हा चित्रपट लोकांच्या मनात घर करून गेला

3/7

चित्रपटाचा प्रभाव आणि गाणी

विशेषतः 'जश्न-ए-बहारा'  आणि 'अजीम-ओ-शान शहंशाह' ही गाणी प्रचंड हिट झाली. या गाण्यांचे संगीतकार ए. आर. रहमान होते.

4/7

ऐश्वर्या रायला जोधा बाईची भूमिका कशी मिळाली?

बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय हीच चित्रपटासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांची पहिली पसंत होती. या चित्रपटात ऐश्वर्याला साईन करण्यासाठी गोवारिकर यांनी ऐश्वर्याला एक सुंदरसा मेसेज पाठवला होता –

5/7

 “Will you be my Jodha?” (तू माझी जोधा बनशील का?) ऐश्वर्याने त्यावर "Yes" असे उत्तर दिले आणि या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग बनली.  

6/7

ऑस्करमध्ये खास स्क्रीनिंग

‘जोधा अकबर’ चित्रपटाला 15 फेब्रुवारी 2025 रोजी 17 वर्षे पूर्ण झाली. या विशेष प्रसंगी, अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (ऑस्कर) यांनी मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग मार्च महिन्यात ऑस्कर मंचावर होणार आहे. हा ऐतिहासिक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच लोकप्रिय आहे तसेच हा भारतीय सिनेमाच्या भव्यतेचे उत्तम उदाहरण मानला जातो

7/7

बॉक्स ऑफिसवरील जबरदस्त कामगिरी

‘जोधा अकबर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सेमी-हिट ठरला. Box Office India च्या अहवालानुसार, या चित्रपटाचे बजेट 55 कोटी रुपये होते आणि याने वर्ल्डवाइड 107 कोटी रुपयांची कमाई केली.