3 तास 44 मिनिटांचा 'हा' चित्रपट करतोय 14 देशांमध्ये ट्रेंड; 1800 कोटींची केलीये कमाई

Biggest Blockbuster Movie: आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आणि अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले.  

तेजश्री गायकवाड | Feb 16, 2025, 13:27 PM IST

Biggest Blockbuster Movie: आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आणि अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले.

 

1/7

Biggest Blockbuster Movie: असे अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर तसेच ओटीटीवरही खळबळ उडवून दिली. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आणि अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर जेवढे प्रेम मिळाले तेवढेच प्रेम OTT वरही मिळत आहे.

2/7

गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. मोठ्या पडद्यावर जबरदस्त यश मिळवणारा हा चित्रपट होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आणि प्रचंड कमाई केली आणि प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक महिने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही या चित्रपटाची क्रेझ कमी होत नसून तो जागतिक ट्रेंडमध्ये कायम आहे आणि अनेक देशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

3/7

आता जाणून घेऊयात आम्ही कोणत्या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल बोलत आहोत. तर त्या सिनेमाचा नाव आहे 'पुष्पा 2: द रुल'. या चित्रपटाने थिएटरमध्ये 1800 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि आता त्याची लोकप्रियता OTT वरही कायम आहे. नेटफ्लिक्सने सांगितले की, हा चित्रपट सलग दोन आठवडे त्यांच्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत राहिला आहे.  

4/7

विशेष म्हणजे जागतिक गैर-इंग्रजी चित्रपटांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे आणि 14 देशांमध्ये तो मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. याला फक्त दोन आठवड्यांत 9.4 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

5/7

अल्लू अर्जुननेही या चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, "प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले ही खरोखर अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आपल्या चाहत्यांचे आभार मानताना तो म्हणाला की हा चित्रपट केवळ थिएटरमध्येच हिट झाला नाही, तर त्याला नेटफ्लिक्सवरही इतका चांगला प्रतिसाद मिळेल याची कल्पना नव्हती." हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. 

6/7

अल्लू अर्जुन व्यतिरिक्त चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगपती बाबू, सुनील, अनसूया भारद्वाज, राव रमेश आणि अजय सारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी निर्मात्यांनी चित्रपटात 23 मिनिटांचे अतिरिक्त फुटेज जोडले असून, त्याचा एकूण रनटाइम 3 तास 44 मिनिटे झाला आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे 400 ते 500 कोटी रुपये आहे आणि जगभरात 1600-1800 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबतच हा आजपर्यंतचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे.

7/7

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट गेल्या वर्षी 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तो नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे.  तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे. मात्र, हिंदी व्हर्जनसाठी चाहत्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.