जावई भारतीय का नाहीत? आनंद महिंद्रा यांना प्रश्न विचारताच त्यांच्या एका उत्तरानं सगळे शांत

Anand Mahindra : सध्या ते चर्चेत आहेत ते म्हणजे एका वक्तव्यामुळे. आनंद महिंद्रा असं काय म्हणाले? कोण आहेत त्यांचे जावई? महिंद्रा यांच्या मुली काय करतात?   

| Jan 03, 2025, 11:50 AM IST

Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा आणि या उद्योगसमुहाला एका उल्लेखनीय स्तरावर पोहोचवणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्याविषयी कायमच कुतूहल पाहायला मिळतं. 

 

1/7

सोशल मीडिया

Anand Mahindra daughters name education family husband

Anand Mahindra : सोशल मीडियावर नव्या संकल्पनांविषयी कुतूहलपूर्ण माहिती देणं असो किंवा मग एखाद्या होतकरु व्यक्तीच्या स्वप्नांना, त्यांच्या पंखांना बळ देणं असो. एक नाव कायमच आघाडीवर असतं, ते नाव आहे आनंद महिंद्रा यांचं. 

2/7

आनंद महिंद्रा

Anand Mahindra daughters name education family husband

एकिकडे जगात नेमकं कुठं काय सुरुय याची अचूक माहिती ठेवणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्या खासगी आयुष्याविषयी मात्र फारशी माहिती नाही. सध्या त्यांच्याच कुटुंबातील अशाच काही व्यक्तींची चर्चा सुरू आहे. या व्यक्ती म्हणजे त्यांचे जावई. 

3/7

दोन मुली

Anand Mahindra daughters name education family husband

आनंद महिंद्रा यांना दोन मुली असून, दिव्या आणि आलिक अशी त्यांची नावं. त्यांच्या या दोन्ही मुली परदेशातच वास्तव्यास असून, शिक्षणापासून लग्नापर्यंत जीवनातील महत्वाचा काळ त्यांनी परदेशातच व्यतीत केला आहे. महिंद्रा यांची मोठी मुलगी दिव्य़ा अमेरिकेत शिकली असून, तिनं 2016 मध्ये वर्व मासिकात कलादिग्दर्शक पदाची जबाबदारी स्वीकारली. 

4/7

शिक्षण

Anand Mahindra daughters name education family husband

आनंद महिंद्रा यांची धाकटी मुलगी आलिक न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असून, तिनं मूव्ही- फिल्म मेकिंगमध्ये पदवी शिक्षण घेतलं आहे. डॉक्यूमेंट्री फिल्म मेकिंग, फोटोग्राफीचंही शिक्षण तिनं घेतलं आहे. 

5/7

परदेशी जावई

Anand Mahindra daughters name education family husband

आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुलींचे पती परदेशी असून, दिव्याच्या पतीचं नाव आहे  Jorge Zapata. तो लॅटिन अमेरिकन आहे. तो न्यूयॉर्क बेस्ड DIAD Architecture म्हणून काम पाहत असून आलिकनंही फ्रेंच प्रियकराशी लग्न केलं असून तीसुद्धा न्यूयॉर्कमध्येच वास्तव्यास आहे. 

6/7

नेटकऱ्यांना उत्तर

Anand Mahindra daughters name education family husband

महिंद्रा यांना त्यांचे जावई परदेशी का आहेत, याविषयी सोशल मीडियावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली आणि या प्रश्नांना पूर्णविरामही मिळाला. 

7/7

मुलींचा निर्णय

Anand Mahindra daughters name education family husband

परदेशी जावयांविषयी महिंद्रा यांनी स्पष्ट केलं की आपण मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. मुलींना त्यांच्या आवडीचा जोडीदार निवडण्याची मुभा असून, मुलींनी पसंत केलेल्या जोडीदाराचा, मुलींच्या निवडीचा आपल्याला अभिमान आहे. दोन्ही जावयांशी आनंद महिंद्रा यांचं मित्रासम नातं असल्याचं ते कायम सांगतात.