महाराष्ट्रातील अगणित धबधब्यांचं गाव, अॅमेझॉनच्या जंगलाला तोड देईल असं जंगल
पावसाळा सुरु झाला की ट्रेकर्स वेध लागतात ते ट्रेकिंगचे. महाराष्ट्राला घनदाट जंगल, उंच पर्वतांचा निसर्ग लाभला आहे. असं असताना अॅमेझॉनच्या जंगलाला देखील मागे टाकेल असा महाराष्ट्रातील हे जंगल.
महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. पावसाळ्यात हा महाराष्ट्र हिरवळीने झाकून जातो. महाराष्ट्राला लाभलेलं जंगल हे कायमच आकर्षणाचं विषय बनलेला आहे. पावसाळ्यात तर अनेक ट्रेकर्स आणि पर्यटकांना हे जंगल येथील धबधबे आकर्षित करतात. असाच अगणित धबधब्यांच गाव म्हणजे 'अंधारबन'. अॅमेझॉनच्या जंगलाला मागे टाकेल असं हे ताम्हिनीमधील 'अंधारबन डार्क फॉरेस्ट'. अगदी आपल्या नावाप्रमाणे अंधारबन आहे.