PHOTO : आई-वडिलांच्या घटस्फोटाची वेदना, करिअरमधील आव्हाने, सलमानच्या बहिणीला डेट केल्यानंतर आता 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात
बॉलिवूडमधील कलाकारांचे आयुष्य जेवढं चमकणारे असतं तेवढंच त्यामागे अनेक वेदनाही असतात. आज आपण ज्या कलाकाराबद्दल बोलतोय हा कपूर कुटुंबातील चिमुकल्याला लहानपणापासून अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. 150 किलो वजनावरुन त्याला ऐकावं लागलं.
1/7

2/7

3/7

इशकजादे या चित्रपटातून परिणीती चोप्रासोबत त्याने करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ‘गुंडे’, ‘2 स्टेट्स’, ‘फाइंडिंग फैनी’ आणि ‘की एंड का’ या चित्रपटात तो झळकला. पण हवं तसं यश या अभिनेत्याला मिळालं नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अर्जुन कपूरने निखिल अडवाणीच्या 'कल हो ना हो' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून नशिब आजमावलंय.
4/7

अर्जुन केवळ 11 वर्षांचा होता तेव्हा त्याचा पालकांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाचा त्याच्यावर खूप परिणाम झाला होता. त्याने खाण्यावर आपलं सगळं ताण काढण्याचा प्रयत्न केला. त्याला खाण्यातून आनंद आणि समाधान मिळत होतं. फास्ट फूडवर त्याचा जास्त कल होता. या सगळ्यामुळे त्याला दम्याचा त्रास होऊ लागला. वयाच्या 16 वर्षांची त्याच वजन हे 150 पर्यंत पोहोचलं होतं.
5/7

त्यानंतर अर्जुन कपूर त्याचा अफेअर्ससमुळे कायम चर्चेत असतो. मीडिया रिपोर्टनुसार असं म्हटलं जात की, चित्रपटात येण्यापूर्वी त्याने सलमान खानची बहीण अर्पिताला डेट केलं होतं. या नात्यात ते दोघे गंभीर होते. त्यांनी भविष्याची स्वप्नेही रंगली होती असं म्हणतात. पण हे नातं दोन वर्ष टिकले. या ब्रेकमागील कारण आजपर्यंत कळलं नाही.
6/7
