एकटे किंवा समुहाने... आषाढीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा आणि सवलती
Ashadhi Ekadashi 2024 : श्री संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानबाबा आणि मुक्ताईंसह अनेक संतमहात्म्यांच्या पालख्या काही दिवसांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात करतील आणि पाहता पाहता पंढरपुरच्या दिशेनं जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची पावलं वळू लागतील.
Ashadhi Ekadashi 2024 : यंदाच्या वर्षी 17 जुलै रोजी आषाढी एकादशी असून, या दिवसासाठी वारकरी आणि प्रशासनही तयारीला लागलं आहे.
1/7
पंढरपूर

2/7
आषाढी एकादशी

Ashadhi Ekadashi 2024 : यंदाच्या वर्षीच्या आषाढी एकादशीसाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिलेला असतानाच प्रशासन आणि यंत्रणाही कामाला लागल्या असून, वारकऱ्यांसाठी आणि पंढरपुरला येणाऱ्या प्रत्येकासाठीच एसटी महामंडळानं काही खास बेत आखले आहेत. आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरच्या दिशेनं येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून 5 हजार विशेष बसगाड्या सोडण्याचं नियोजन केलं असून, प्रवाशांना या सुविधेअंतर्गत काही विशेष सेवाही पुरवल्या जाणार आहेत.
3/7
पंढरपूर गाठणं सहज शक्य

राज्याच्या कोणत्याही गावातून आता पंढरपूर गाठणं सहज शक्य होणार आहे. कारण, तुम्ही एकट्यानं प्रवास करा किंवा समुहानं, एसटी तुमच्या सेवेत हजर असेल. आषाढीच्या निमित्तानं राज्याच्या कोणत्याही गावातील 40 किंवा त्याहून जास्त भाविक, प्रवाशांनी पंढरपुरला जाण्याची एकत्रित मागणी केल्यास या गावासाठी समर्पित अशा एसटी बसची सुविधा महामंडळाकडून करून देण्यात येईल. यासाठी प्रवाशांनी नजीकच्या एसटी आगाराशी थेट संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
4/7
खास सुविधा

5/7
वारीला होणारी गर्दी

6/7
जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बस

7/7
प्रवाशांसाठी खास सवलती
