गव्हाच्या पीठाऐवजी हे धान्य आहे सुपरफूड! हृदय विकार ते ब्लड शुगर, अनेक आजार दूर पळतील

आपल्या रोजच्या जेवणात गव्हाच्या पोळ्या या असतातच. पण निरोगी आरोग्यासाठी काही अन्य पर्यायांची चाचपणी करणेदेखील महत्त्वाचे आहे. 

Mansi kshirsagar | Feb 17, 2025, 14:20 PM IST

Benefits Of Eating Barley: आपल्या रोजच्या जेवणात गव्हाच्या पोळ्या या असतातच. पण निरोगी आरोग्यासाठी काही अन्य पर्यायांची चाचपणी करणेदेखील महत्त्वाचे आहे. 

 

1/7

गव्हाच्या पीठाऐवजी हे धान्य आहे सुपरफूड! हृदय विकार ते ब्लड शुगर, अनेक आजार दूर पळतील

 health tips in marathi advantages of eating barley flour daily

जवाचे पीठ (barley flour) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. आपल्या आहारात जवाच्या पीठापासून बनवलेली चपाती सामील करण्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात.   

2/7

जवाचे पीठ वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात फायबरचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळं पोट दीर्घकाळापर्यंत भरेलेले राहते आणि खाण्याची इच्छा कमी होते. 

3/7

जवाचे पीठ पाचनसंस्था मजबूत करते. फायबर आतड्यांतील घाण बाहेर काढते आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि अन्य पाचनाच्या समस्यांपासून आराम देते.   

4/7

जवाचे पीठ कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. त्यामुळं हृदयाशी संबंधीत धोका कमी होते. 

5/7

जवाच्या पीठातील फायबर ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पीठ फायदेशीर आहे. 

6/7

 जवाचे पीठ त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यात अँटी ऑक्सीडेंट्स आणि मिनरल्स त्वचेला पोषण देतात. 

7/7

जवाच्या पीठात कॅल्शियम आणि मॅग्निशियमसारखे मिनरल्स असतात जे हाडांना मजबूत आणि निरोगी ठेवतात.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)