Photos: 'त्या' महिलेचं 27 किलो सोनं, 1116 किलो चांदी, 1526 एकर जमीन राज्य सरकारकडून जप्त

Gold Assets Seized By State Government: मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणाची जोरदार चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वीच हा सर्व ऐवज राज्य सरकारने ताब्यात घेतला आहे. या संपत्तीची किंमत काही लाख कोटींमध्ये असेल असा अंदाज बांधला जात आहे. नेमकं काय काय जप्त करण्यात आलं आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | Feb 17, 2025, 13:21 PM IST
1/14

jayalalithaagold

सध्या देशभरामध्ये याच प्रकरणाची चर्चा आहे. फोटोत दिसणारे पोलीस कर्मचारी पेट्यांमध्ये भरलेला हा ऐवज गाड्यांमध्ये ठेवताना दिसत आहेत. नेमकं घडलंय काय आणि कोण आहे ही महिला जाणून घ्या सविस्तर वृत्त...

2/14

jayalalithaagold

मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती प्रकरणामध्ये तामिळनाडूमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई एका माजी मुख्यमंत्र्यासंदर्भात करण्यात आली असून अनेक किलो सोनं आता थेट राज्य सरकारच्या ताब्यात आलं आहे. बंगळुरुमधील कोर्टाने आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

3/14

jayalalithaagold

सदर प्रकरण हे माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्यासंबंधित आहे. बंगळुरु कोर्टाने या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना वादात असलेलं सर्व सोनं सरकारच्या ताब्यात दिलं जावं असे आदेश दिले आहेत.  

4/14

jayalalithaagold

यानंतर सरकारने ताब्यात घेण्यात आलेल्या आणि एकेकाळी जयललितांकडे असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे सोन्याची तलवार आणि सोन्याच्या मुकुटाचाही समावेश आहे. कर्नाटक सरकारने हा ऐवज तामिळनाडू सकारकडे सोपवला आहे.  

5/14

jayalalithaagold

तामिळनाडू सरकारकडे सोपवण्यात आलेल्या ऐवजामध्ये हिऱ्याचं काम असलेल्या मोरांचं डिझाइन असणारं मुकूटही आहे.

6/14

jayalalithaagold

कर्नाटक सरकारने आतापर्यंत या प्रकरणामध्ये 27 किलो 558 ग्राम सोनं ताब्यात घेतलं आहे. तसेच 1116 किलो चांदी आणि 1526 एकर जमिनीची कागदपत्रं ताब्यात घेतली आहे.

7/14

jayalalithaagold

हे सर्व साहित्य कर्नाटकमधील विधानसौंद येथील कोषागरामध्ये ठेवण्यात आलं आहे.

8/14

jayalalithaagold

या सोन्याच्या ऐवजामध्ये काही सोन्याच्या मुकुटांचाही समावेश आहे. या सोन्याच्या ऐवजाचे काही फोटो व्हायरल झाले असून ते चांगलेच चर्चेत आहेत.   

9/14

jayalalithaagold

अन्य एक ऐवज हा चक्क जयललिता यांची सोन्याची छोटी प्रतिकृती आहे.   

10/14

jayalalithaagold

एका हिऱ्याच्या हाराचाही समावेश तामिळनाडू सरकारकडे सोपवण्यात आलेल्या या ऐवजामध्ये आहे.  

11/14

jayalalithaagold

काही सजावटीच्या सोन्याच्या प्लेट्सही या ऐवजामध्ये असून त्यावर जयललितांची नमस्कार करतानाची प्रतिमा आहे.

12/14

jayalalithaagold

सोन्याच्या लहानमोठ्या बऱ्याच गोष्टी या ऐवजामध्ये आहेत. 

13/14

jayalalithaagold

हिरेजडीत गोल्डन ब्रेस्टलेट्सही या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत आहेत. सोन्याच्या एकूण 481 वस्तू यामध्ये आहेत.  

14/14

jayalalithaagold

जयललिता यांचा 2016 साली मृत्यू झाला. जयललितांना मिळालेलं हे सोनं मागील 21 वर्षांपासून कर्नाटक सरकारच्या तिजोरित होतं.