Ashadhi Wari 2023: विठू नामाचा जयघोष... तुकाराम महाराजांच्या पालखीचा 338 वा प्रस्थान सोहळा संपन्न!

Tukaram Maharaj palakhi: माऊली नामाचा गजर...विठू नामाचा जयघोष... 

Jun 11, 2023, 00:39 AM IST

Ashadhi Wari 2023: टाळ मृदुंगाच्या तालावर आज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचा 338 वा प्रस्थान सोहळा संपन्न झाला. अत्यंत भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालखीने तमाम वारकऱ्यांचं माहेर असणाऱ्या पंढरीकडे प्रस्थान ठेवलंय. 

1/5

पादुकांचे विधिवत पूजा

प्रस्तानापूर्वी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सहपत्नी उपस्थित होते. यांच्या हस्ते पादुकांचे पूजन आणि महाआरती झाली.

2/5

मान्यवरांची उपस्थिती

याप्रसंगी भोसरीचे आमदार महेश लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, तसंच आमदार सुनील शेळके, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

3/5

मानाच्या दिंड्या

दुपारी दोनच्या सुमारास पालखी मंदिरातून बाहेर आली त्यानंतर पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घातली त्याचबरोबर उपस्थित मानाच्या दिंड्यांनी देखील मंदिरात प्रदक्षिणा घेतली त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी महाद्वारातून बाहेर आली. 

4/5

देहू नगरीत गर्दी

पालखी महाद्वारातून बाहेर येतात तमाम देहूकरांनी तुकाराम तुकाराम असा एकच गजर केला. हा अनुपम्य सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी देहू नगरीत गर्दी केली होती. 

5/5

इनामदार वाड्यात पालखी विसावली

पालखी महाद्वारातून बाहेर आल्यानंतर काहीच अंतरावर असणाऱ्या इनामदार वाड्यात पालखी आज विसावली उद्या तुकोबांची पालखी पुन्हा पंढरीकडे मार्गस्थ होईल.