एशियन गेम्सचा समारोप, भारतासाठी विक्रमी स्पर्धा... पाहा रंगारंग फोटो

Asian Games Closing Ceremony: चीनच्या हांगझाऊमध्ये पार पडलेल्या एशियन गेम्स स्पर्धेची सांगता झाली आहे. उद्घाटन समारंभाप्रमाणेच स्पर्धेचा सांगात समारोपही रंगतदार ठरला. भारतासाठी यंदाची एशियन गेम्स स्पर्धा विक्रम ठरली आहे. भारताने एशियन गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच शंभराहून अधिक मेडल मिळवलेत. 

| Oct 09, 2023, 22:28 PM IST
1/7

चीनच्या हांगझाऊनमध्ये 23 सप्टेंबरला एशियन गेम्सची सुरुवात झाली. तब्बल 15 दिवस पार पडलेल्या या स्पर्धेचा 9 ऑक्टोबरला समारोप झाला. स्पर्धेचा सांगता समारोपही अगदी भव्य-दिव्य होता. 

2/7

एशियन गेम्सच्या सांगता समारोपाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या स्पर्धेत 45 देशांचे जवळपास बारा हजार खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत 40 क्रीडा प्रकारांचा समावेश होता.

3/7

19 व्या एशियन गेम्समध्ये चीन अव्वल स्थानावर होतं.चीनने तब्बल 383 मेडलची लयलूट केली. यात 201 गोल्ड , 111 सिल्व्हर आणि 71 ब्राँझ मेडलचा समावेश आहे.   

4/7

दुसऱ्या क्रमांकावर जपानने बाजी मारली आहे. जपानच्या खात्यात 188 मेडलची नोंद झाली. यात 52 गोल्ड मेडलचा समावेश आहे. याशिवाय 67 सिल्व्हर आणि 69 ब्राँझ मेडल जपानने पटकावली आहेत. 

5/7

यंदाचे एशियन गेम्स भारतासाठी विशेष महत्त्वाचे ठरले. भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत यंदा पहिल्यांदाच शंभरहून अधिक मेडल्सची कमाई केली. भारताने तब्बल 107 मेडल्स पटकावली. यात 28 गोल्ड मेडलसह 38 सिल्व्हर आणि 41 ब्राँझ मेडलचा समावेश आहे. 

6/7

एशियन गेम्समध्ये क्रिकेट प्रकारात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या पुरुष आणि महिला क्रिकेट टीमने गोल्ड मेडलची कमाई केली. याशिवाय पुरुष हॉकी संघाने गोल्ड मेडल मिळवलं. तर महिला हॉकी संघाला ब्रांझ मेडल मिळालं. बॅडमिंटन, तिरंदाजीत भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं.

7/7

या स्पर्धेत दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमांकावर होता. दक्षिण कोरियाने 42 गोल्ड, 59 सिल्व्हर, 89 ब्राँझ मेडल जिंकली.