Maruti च्या 'या' गाड्यांवर 95 हजार रुपयांपर्यंतची सूट

Dec 22, 2018, 09:01 AM IST
1/6

विटारा ब्रिझा

विटारा ब्रिझा

मारूतीची एसयूवी कार विटारा ब्रिझावर कंपनीने जास्त डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर दिलेला नाही.यावर मारूतीकडून 15 हजार रुपयांच डिस्काऊंट आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. एकूण 30 हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे. ही ऑफर आणि डिस्काऊंट प्रत्येक शहरात वेगवेगळी आहे.

2/6

डिझायर

डिझायर

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूतीची बेल्ट सेलिंग सेडान कार डिझायरवर वर्षाच्या अखेरिस 90,100 रुपयांपर्यंत ऑफर मिळणार आहे. पेट्रोल वेरिएंटवर 45,100 रुपये डिस्काऊंट आणि 20,000 रुपये एक्सचेंज बोनस आहे. तर डिझेल वेरिएंटवर 60,100 रुपये डिस्काऊंट आणि 30 हजार रुपये एक्सचेंज बोनस मिळणार आहे. 

3/6

मारुति स्विफ्ट

मारुति स्विफ्ट

मारूतीच्या लोकप्रिय कारमध्ये स्विफ्टवर कंपनीने 70,100 रुपयांचा डिस्काऊंट ऑफर दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वेरिएंटवर वेगवेगळा डिस्काऊंट आहे. पेट्रोल वेरिएंटवर 40,100 रुपये डिस्काऊंट आणि 15 हजार एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे. तर डिझेल वेरिएंटवर 50,100 रुपये डिस्काऊंट आणि 20 हजार एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे. 

4/6

वॅगनार

वॅगनार

मारुतीची लोकप्रिय हॅचबॅक कार वॅगनारवर 70,100 रुपयांपर्यंत डिस्काऊंट तर 25 हजार रुपयांपर्यंत बोनस दिला जाणार आहे. एकूण ग्राहकांना 95,100 रुपयांचा फायदा होणार आहे. 

5/6

सेलेरियो एएमटी

सेलेरियो एएमटी

ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये मारूती सेलेरियोवर एकूण 95,100 रुपयांचा डिस्काऊंट आहे. जर तुम्ही ही कार खरेदी केलीत तर तुम्हाला 70,100 रुपयांचा डिस्काऊंट आणि 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे. 

6/6

ऑल्टो 800

ऑल्टो 800

मारूती सुझुकीची एन्ट्री लेवल कार ऑल्टो 800 वर कंपनीकडून 75,100 रुपयांचा डिस्काऊंट ऑफर केला आहे. या डिस्काऊंटमध्ये 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. यामध्ये 55,100 रुपये डिस्काऊंट आणि 20 हजार एक्सचेंज बोनस आहे.