देशात यंदा सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज

देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत 96 टक्के ते 104 टक्के पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

May 26, 2023, 23:37 PM IST

Monsoon 2023 : देशात यावर्षी सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने आज मान्सूनचं दुसरं पूर्वानुमान जारी केले आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. 4 जूनला मान्सून केरळात दाखल होईल असा इशारा देण्यात आला आहे. 

1/6

जूनमध्ये भारतात दक्षिण द्वीपकल्प, पश्चिम राजस्थान, लडाखमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

2/6

या वर्षीचा मान्सूनचा पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा कमी राहणार. 

3/6

9 जूनपासून मान्सून दाखल होणार असून 18 जूनपर्यंत सर्वत्र पसरणार आहे.

4/6

मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. 

5/6

शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. 

6/6

4 जूनला मान्सून केरळात दाखल होईल.