New Parliament House : नव्या संसद भवनाचे पहिले फोटो समोर... पाहा त्याची भव्यता

New Parliament House : नव्या संसद भवनाची इमारत पूर्ण झाली आहे. येत्या 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण होणार आहे. त्याआधी नव्या संसद भवन इमारतीचे (New Parliament House) फोटो समोर आले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी नव्या संसद भवानासाठी केंद्र सरकारकडे आग्रह केला होता. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं.

| May 26, 2023, 20:45 PM IST
1/6

नवं संसद भवन अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. त्रिकोणी आकार असलेल्या संसद भवनाची इमारती अतिशय भव्य आणि दिव्य आहे. सेंट्रल विस्टा योजनेतंर्गत या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे. 

2/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2020 मध्ये संसद भवना इमारतीचं भूमीपूजन केलं होतं. टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला या प्रकल्पाचं काम देण्या आलं होतं. या इमारतीची रचना प्रसिद्ध आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केली आहे. बिमल पटेल हे गुजरातच्या अहमदाबाद शहरातले आहे. याआधी त्यांनी अनेक इमारतींचं डिझायन केलं आहे. 

3/6

भारताच्या लोकशाहीचा वारसा दाखवण्यासाठी या इमारतीमध्ये एक भव्य संविधान सभागृह बांधण्यात आलं आहे. याशिवाय संसद सदस्यांसाठी एक लाऊंज, पुस्तकालय, समिती कक्ष, भोजन क्षेत्र आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ठ ठेवण्यात आलं होतं. 

4/6

नव्या संसद भवनात 1280 खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आता जुन्या संसद भवन इमारतीत लोकसभेत 550 आणि राज्यसभेत 240 खासदार बसू शकतात. हे संसद भवन 1927 साली बांधण्यात आलं होतं. 

5/6

नव्या संसद भवनात तीन मुख्य द्वार आहेत. ज्ञान द्वार, शक्ति द्वार आणि कर्मा द्वार अशी त्यांना नावं देण्यात आली आहेत. खासदार आणि व्हिजिटर्सना वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून आत सोडलं जाणार आहे. 

6/6

त्रिकोणी आकारतलं नवं संसद भवन एकूण चार मजल्याचं आहे. तब्बल 64,500 चौरस मीटरमध्ये या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाला बाराशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. यासाठी दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.