रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या मंदिरात 250000 किलो फुलांनी सजावट; हे Photos पाहाच

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Flower Decoration: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राम मंदिरामध्ये फुलांची साजवट करण्यात आली आहे. सजावटीचे फोटो सोशल मीडियावर श्री राम जन्मभूमि तीर्थ श्रेत्रच्या खात्यावरुन शेअर करण्यात आलेत. हेच फोटो पाहूयात...

| Jan 22, 2024, 06:33 AM IST
1/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Flower Decoration

अयोध्येतील राम मंदिरात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या घुमटावर रोषणाई करण्यात आली आहे.

2/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Flower Decoration

लाल, पिवळ्या, लेव्हेंडर, पांढऱ्या अशा अनेक रंगांच्या फुलांची सजावट मंदिरात करण्यात आली आहे.

3/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Flower Decoration

पांढऱ्या रंगातील मंदिरावर या रंगेबीरंगी फुलांची साजवट फारच आकर्षक दिसत आहे.

4/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Flower Decoration

मंदिरातील स्तंभांवरही फुलांचं डोकोरेशन करण्यात आलं असून दिव्यांची आरास करण्यात आली आहे.  

5/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Flower Decoration

अयोध्येतील मंदिरात आज होणाऱ्या सोहळ्याआधी ही फुलांची आरास करण्यात आली आहे.

6/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Flower Decoration

भव्य सभामंडपामध्ये या फुलांची आरस अधिक उठून दिसत आहे. डेकोरेशनसाठी 2 लाख 50 हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.

7/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Flower Decoration

फुलांच्या सजावटीचं काम विशेष कारागिरांकडे काम सोपवण्यात आलं होतं. थायलंड आणि अर्जेंटिनामधूनही फुलं मागवण्यात आली आहेत.

8/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Flower Decoration

घुमटाच्या आतील बाजूस असलेली पिवळ्या रंगाची रोषणाई अधिक चारचांद लावत आहे.